२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले आणि खऱ्या लोकशाहीच पर्व सुरु

आज २६ जानेवारी २०२२ रोजी आपण ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वत्र आनंदात हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करत आहोत. याच दिवशी म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले आणि खऱ्या लोकशाहीच पर्व खऱ्या अर्थाने सुरु झाले. याची आठवण म्हणून दरवर्षी आपण २६ जानेवारी हा ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा करतो.

राजपथावर होणाऱ्या संचलनात  देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी झाले आहेत. आज (२६ जानेवारी) राजपथावर होणाऱ्या संचलनात राजपथावर महाराष्ट्रातील ‘जैवविविधतेचे दर्शन होत आहे. हा चित्ररथ ‘जैवविविधता मानके’ विषयावर आहे.

यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’, ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखरू, विवीध अभयारण्यातील दुर्मिळ होत असलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती अशी जैवविविधता दाखवणारा चित्ररथ आपल्याला राजपथावर होणाऱ्या संचलनात पाहायला मिळत आहे.२६ जानेवारी हाच का दिवस निवडला २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने अभ्यासपूर्ण अशी राज्यघटना  २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवसांत पूर्ण केली. २४ जानेवारी १९५० रोजी  हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही प्रतीवर घटना समितीच्या ३०८ सदस्यांनी स्वाक्षरी केल्या आणि ही राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपण स्वीकारली

Latest News