किरीट सोमय्या आणि संबधीत अधिकाऱ्या वर कारवाई करा:NCP रूपाली पाटील

पुणे; “स्वयंघोषित भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ मंत्रालयात जाऊन लपून फाईली चाळतात; कंगनाची हुजरेगिरी करणारे आता विचारतील का कुठल्या अधिकारात हे केले? या प्रकरणातील गाफील अधिकारी व बाबूसह स्वयंघोषीतावर कारवाई झालीच पाहिजे. किरीट सोमय्यानेहमी त्यांच्या आरोप-प्रत्यारोपावरून चर्चेत येत असतात. अशात त्यांचा मंत्रालयातील अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसलेला फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. मंत्रालयात जाऊन शासकीय अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल तपासणे त्यांना चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणावर राजकीय स्तरातून अनेकांनी प्रतिक्रिया देत सोमय्यांवर चांगलीच टिका केली आहे

या प्रकरणावरून प्रशासनाने सोमय्यायांना नोटीस पाठवली असून दोन दिवसात उत्तर द्यावे अशी सूचना करण्यात आली आहे. सोबत ज्या अधिकाऱ्याच्या खुर्चीवर किरीट सोमय्या बसले होते त्या अधिकाऱ्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट करत किरीट सोमय्या आणि या प्रकरणातील गाफील अधिकारींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे


Latest News