राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पुणे -७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग येथील कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्लजी तलेरा ह्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.यावेळी उपस्थित सर्व स्वयंसेवकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व सामूहिक राष्ट्रगीत झाले.या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे व पुण्यातील कसबा भागाचे संघचालक प्रशांत यादव तसेच भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी हे उपस्थित होतेध्वजारोहणानंतर प्रफुल्ल तलेरा यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच प्रशांत यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

फोटो ओळ

क्रमांक १ फोटो
-७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी उद्योजक प्रफुल्ल तलेरा, पुणे महानगर कार्यवाह महेश करपे,कसबा भाग संचालक प्रशांत यादव,राजीव जोशी
क्रमांक २ फोटो

७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी प्रमुख पाहुणे उद्योजक प्रफुल्ल तलेरा यांचे स्वागत करतांना,शेजारी पुणे महानगर कार्यवाह महेश करपे,कसबा भाग संघचालक प्रशांत यादव

२६ जाने २२
मोतीबाग,शनिवार पेठ

Latest News