भरत व्होरा यांच्याहस्ते ध्वजारोहण उत्तम नागरिक घडवावेत : भरत व्होरा


पुणे :प्रजासत्ताक दिनानिमित्त तळेगाव येथील जैन विद्यालय, पार्श्वनाथ गुरुकुल आणि प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चिंचवड येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक भरत शेठ व्होरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे दीपक शहा यांनी आयोजन केले . डॉ. दीपक शहा,शैलेश शहा ,शिवणे येथील प्रसिद्ध उद्योजक अभिजित (आबा) दांगट पाटील आणि राहुल (अप्पा) गराडे ,पराग आठवले ,लायन्स क्लब तळेगावचे सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना भरत व्होरा म्हणाले ,’ शिक्षकांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळेच मी झपाट्याने शैक्षणिक क्षेत्रात मी, प्रगती करू शकलो. अशा आदर्श शिक्षकांमुळेच मी पदवी प्राप्त करून व्यवसायात प्रवेश करून आज यशस्वी झालो असलो तरी, शिक्षकांमध्ये अशक्याला शक्य करण्याची ताकद असते अशा शिक्षणामुळेच मी घडलो. आपणही विद्यार्थ्यांना धाकात न ठेवता प्रेम, आदर्शाच्या जोरावर त्यांना उत्तम नागरीक घडवू शकता. कुंभार जसा मातीला आकार देवून शिल्प बनवतो तसे आपण शिक्षकही विद्यार्थ्यांसाठी कुंभार आहात त्यांना कसा आकार द्यायचा हे तुम्हीच ठरवू शकता.