तरुण, महिला आणि शेतकऱ्यांसाठी बजेट :पंतप्रधान नरेंद्र मोदी

narendramodi-iansnewpicture_3

नवीदिल्ली: यंदाच्या अर्थसंकल्पाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना विशेष महत्व देण्यात आलं आहे. तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहे. या अर्थसंकल्पातून सर्वांनाच फायदा होणार आहे. देशातील गरीबी मिटविण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केला जाणार आहे. तरुण, महिला आणि शेतकऱ्यांसाठी हे बजेट आहे”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.““

“गावागावांत ब्राॅडबॅण्ड सुविधा उभी करणार आहे. त्याचबरोबर लवकरच 5G ची सुरू करण्यात येणार आहे. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये एटीएमची सुविधा देण्यात येणार आहे. आणि पासपोर्टमध्ये ई-चीप बसविण्यात येणार आहे. 5G योजनेतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे”, अशीही माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ निर्मला सितारमन यांनी संसदेत वाचण्यास सुरूवात केली आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल मत व्यक्त वित्तमंत्र्यांनी असं सांगितलं की, “शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनेल्स सुरू करणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या रेडिओ आणि टीव्ही चॅनेल्सद्वारे डिजीटल शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. अंगणवाड्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. “, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत दिली

2022 ते 23 मध्ये आरबीआयचं डिजीटल चलन येणार आहे. या डिजिटल चलनामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. राज्यांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या घोषणेमुळे आभासी चलनांना मान्यता मिळण्याची शक्यता कमी झालेली आहे. आरबीआयकडून डिजीटल रुपया येणार आहे”, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली आहे.

Latest News