एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या कारवर गोळीबार …

लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप आणि हिंसाचाराच्या घटना या आता आपल्याकडे जणून नेहमीच्याच झाल्या आहेत. याचीच पुनरावृत्ती घडली असून एमआयएमचेअध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या कारवर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे. ओवैसी यांनी स्वतः असा दावा केला आहे..

आज मी सकाळी दिल्लीहून मेरठला पदयात्रेसाठी गेलो होते. किठौर इथं पदयात्रा झाल्यानंतर पुन्हा दिल्लीकडे येण्यासाठी निघालो तेव्हा एका टोल नाक्यावर पोहोचलो तेव्हा आमच्यासोबत चार वाहनं होती. आमच्या कारच्या पुढे आणि मागेही आमच्या सहकाऱ्यांच्या कार होत्या. जशी आमची कार टोल प्लाझाजवळ हळू झाली तेव्हा जोरात आवाज आला. त्यानंतर पुन्हा एक आवाज आला. यावेळी आमच्या कारच्या ड्रायव्हरनं सांगितलं की, हल्ला झाला. त्यानंतर ड्रायव्हरनं मोठ्या शिताफिनं आमची कार तिथून बाहेर काढली. त्यानंतर पुन्हा गोळीबाराचा आवाज आला. यावेळी तीन ते चार गोळ्या चालवल्या गेल्या. माझ्या कारच्या डाव्या बाजूला दोन गोळ्या लागल्याचं निशाण आहे.

तसेच कारचा उजव्या बाजूचा टायरही पंक्चर झाला. त्यानंतर पुढे असणाऱ्या फ्लायओव्हरवर आमची कार थांबवली आणि आमच्या सहकाऱ्यांच्या दुसऱ्या कारमधून आम्ही पुढे रवाना झालो. पण त्यानंतरही आमच्यावर काहीजण पाळत ठेवत असल्याचा आम्हाला संशय आहे

Latest News