शामभाऊ जगताप यांच्या निवासस्थानी एकनाथ खडसे साहेब यांनी सदिच्छा भेट


शामभाऊ जगताप यांच्या निवासस्थानी एकनाथ खडसे साहेब यांनी सदिच्छा भेट
पिंपरी, प्रतिनिधी :
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे साहेब यांनी सदिच्छा भेट देत शामभाऊ जगताप यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी शामभाऊ जगताप यांच्या तर्फे जगद्गुरू तुकाराम महाराज पगडी, भक्तीशक्ती शिल्प, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन एकनाथ खडसे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघिरे पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, फजल शेख, प्रशांत सपकाळ, युवा नेते तानाजी जवळकर, अमरसिंग आदियाल, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, मदन लाठी, शांताराम जगताप, विलास तात्या जगताप, दिलीप अण्णा काशीद, हनुमंत भागुजी जगताप, मधुकर रणपिसे महाराज, अशोक जगताप, दत्तात्रय जगताप, नरेश जगताप, कालिदास जगताप, शंकर तात्या जगताप, जनार्दन जगताप, राघोजी जगताप, सुमित जगताप, गणेश काशीद, बाळासाहेब भालेकर, अतुल काशीद, गणेश जगताप, नितीन काशीद, पै. निखिल जगताप, राहुल चोथवे, हितेश जाधव, संदीप नलावडे, विशाल गांगर्डे, शुभम पिंपळे, मिथुन देवकर, हिमांशू जगताप, पप्पू खामकर, सुदर्शन भोस, अजय केवट, प्रवीण शिंदे, रमेश कसबे, प्रफुल साखरे, हरीश जाधव, अमित जगताप, नंदू गांगर्डे, उमेश माने, संकेत विधाते, गणेश फुगे, अनिकेत खोत, पप्पू जगताप, सौरभ,जगताप, रमेश कसबे, आलोक गिरमे, भास्कर सदामते, युवराज पवार, तसेच शामभाऊ जगताप मित्र परिवार आदी उपस्थित होते.
आगामी महापालिका निवडणुकीत पिंपळे गुरव, सांगवी परिसरातील खान्देशवासिय पूर्ण ताकदीने शामभाऊ जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.