भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम —— चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण


——————-
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
पुणे :
भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) मध्ये स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम उपक्रमाद्वारे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ सचिन वेर्णेकर हे कार्य्रक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘कर्मचारी प्रशिक्षणाचा उपक्रम दुर्मिळ असून आम्ही त्यात सातत्य ठेवणार आहोत.सर्व कर्मचारी हे भारती विद्यापीठाचे ब्रँड अँबॅसिडर असून त्यांनी प्रभावीपणे काम केल्याने भारती विद्यापीठाचे नाव आणखी उंचावणार आहे. सचोटी ,कार्यक्षमता ,प्रामाणिकपणा ,चांगले संवादकौशल्य यावर सर्वानी भर द्यावा ‘,असे प्रतिपादन डॉ सचिन वेर्णेकर यांनी केले.
डॉ सोनाली खुर्जेकर यांनी एटीकेट्स,मॅनरिजम विषयावर,डॉ प्रवीण माने यांनी नियमप्रणाली विषयावर मार्गदर्शन केले.डॉ सचिन आयरेकर यांनी संयोजन केले,डॉ प्रमोद पवार,डॉ रामचंद्र महाडिक यांनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.एकूण ६१ कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात प्रशिक्षण घेतले.शनिवार दि ५ फेब्रुवारी रोजी भारती विद्यापीठाच्या पौड रस्ता कॅम्पस मधील आयएमइडी सेमिनार हॉलमध्ये हे प्रशिक्षण पार पडले