शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
पिंपरी : शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख गजानन पोपट चिंचवडे (वय ५३, रा. चिंचवडगाव) यांचे शनिवारी (ता. ५ फेब्रुवारी) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये पत्नीला स्थायी समिती सदस्य व गटनेते म्हणून संधी न दिल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत हातात कमळ घेतले होते. तरीही त्यांनी शिवसेना वा त्यांच्या इतर कुणावरही टीका केली नव्हती. त्यांनी चार महिन्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेल्यानंतर चिंचवडे यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला अन्‌ ते तिथेच कोसळले. जवळच्या खासगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. पण, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यामागे पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी चिंचवडे व दोन मुलगे असा परिवार आहे.
गेल्या सप्टेंबरमध्ये शिवसेना सोडली होती. भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवडे यांना पक्षात घेतले होते, त्यामुळे चिंचवडे यांच्या अकाली निधनामुळे भाजपलाही मोठा धक्का बसला आहे..

Latest News