पुणे महापालिकेत किरीट सोमय्या पळता पळता पडले, संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल


पुणे महापालिकेत किरीट सोमय्या पळता पळता पडले संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल
पुणे: शिवसेनेचे कार्यकर्ते किरीट सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु, यावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. संतापलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्याच्या कारच्या काचांवर हाताने ठोसे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. मात्र आक्रमक शिवसैनिकांशी झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या अक्षरश: महापालिकेच्या पायऱ्यांवर पडले त्यामुळे त्याना तात्काळ संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे
किरीट सोमय्याच्या सुरक्षा रक्षकांनी शिवसैनिकांवर सौम्य लाठीचार्ज करत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीमुळे महापालिकेच्या आवारात चांगलाच गोंधळ उडाला होता.या झटापटीत किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. याच दरम्यान त्यांनी ट्विट करत पुन्हा एकदा शिवसैनिकांवर निशाणा साधला आहे. ‘पुणे महापालिकेच्या आवारात शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला.” असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर आरोप केला आहे.
शिवसैनिकांनी किरीट सोमय्या कारसमोर लोटांगण घालत त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिक (Shivsena) चांगलेच आक्रमक झाले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी किरीट सोमय्य शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते.
किरीट सोमय्या महापालिकेत पोहचताच तिथे आधीच उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांची गाडी अडवली. शिवसैनिकांनी किरीट सोमय्या कारसमोर लोटांगण घालत त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिक) चांगलेच आक्रमक झाले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता