भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’ ग्रंथावरील वार्षिक व्याख्यानमालेचा रविवारी समारोप जपानचे गणितज्ञ प्रा. मिशिओ यानो यांची विशेष उपस्थिती


भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’ ग्रंथावरील वार्षिक व्याख्यानमालेचा रविवारी समारोप
जपानचे गणितज्ञ प्रा. मिशिओ यानो यांची विशेष उपस्थिती
पुणे :
गणिताची गोडी निर्माण करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या “अंकनाद – गणिताची सात्मीकरण प्रणाली” द्वारे आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स तर्फे आयोजित भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’ ग्रंथावरील वर्षभर चाललेल्या व्याख्यानमालेचा समारोप रविवार,१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. गणित अभ्यासक प्रा.सुधाकर आगरकर यांनी वर्षभर या मासिक व्याख्यानमालेत मार्गदर्शन केले.
समारोपाच्या सत्राला जपानच्या सायन्स कौन्सिल चे माजी सदस्य प्रा. मिशिओ यानो आणि विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ विजय बेडेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.मॅप एपिक कम्युनिकेशन्स चे संचालक मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
गणिते अगदी सहजतेने पार पाडण्यासाठी गणिताची साधने जाणून घेणे अनिवार्य आहे. अशा साधनांपैकी एक म्हणजे मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडने गणित आत्मसात करण्यासाठी विकसित केलेली’ अंकनाद प्रणाली’ आहे. हे पूर्ण संख्या आणि अपूर्णांकांच्या संगीत पाढ्याशी संबंधित आहे. “लीलावती” सारख्या प्राचीन साहित्यात वापरल्या जाणार्‍या गणिती संकल्पनांवर आधारित व्याख्यानमाला देखील तयार केली आहे,जी डॉ. सुधाकर आगरकर यांनी अतिशय यशस्वीपणे मांडली.
https://us06web.zoom.us/j/88414418970?pwd=dGdJMElsdlpsWU90NllOcW0xZDZjdz09 या लिंकद्वारे विनामुल्य सहभागी होता येईल.त्यासाठी 884 1441 8970 हा मिटिंग आयडी असून Aanknaad हा पास कोड आहे .
प्रोफेसर मिचिओ यानो यांच्याविषयी :हे क्योटो सांग्यो विद्यापीठातील एमेरिटस सायंटिस्ट आहेत आणि ते जपानच्या सायन्स कौन्सिलचे माजी सदस्य, इंटरनॅशनल अकादमी ऑफ हिस्ट्री ऑफ सायन्सचे सदस्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेटचे काम पूर्ण करणारे अनेक विद्यार्थी आहेत आणि नामवंत जर्नल्समध्ये त्यांच्या शोधनिबंधांसाठी त्यांना मिळालेले दाखले त्यांच्या कार्याचे महत्त्व सिद्ध करतात.
लीलावती ग्रंथाविषयी :भास्कराचार्याचा लीलावती हा ग्रंथ सर्वात लोकप्रिय आहे. गणित मनोरंजक करून कसे शिकवावे याचा तो एक आदर्श नमुना आहे. त्यामुळे लीलावतीने अगोदरच्या सर्व गणित ग्रंथांना मागे सारून अग्रस्थान मिळविले. पुढे सुमारे ६०० वर्षे भास्कराचार्याचे लीलावती आणि बीजगणित हे ग्रंथ संपूर्ण भारतभर गणित शिकवण्यासाठीची पाठ्यपुस्तके झाली होती. या ग्रंथावर अनेक विद्वानांनी भाष्ये लिहिली, अनेक परदेशी भाषांत त्याची भाषांतरे झाली. सन १६१२ साली लीलावतीचे पर्शियन भाषेत भाषांतर झाले. हेन्री थॉमस कोलब्रुक या ब्रिटिश विद्वानाने सन १८१७ साली लीलावतीचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले.
‘अंकनाद ‘ अॅप विषयी : ‘अंकनाद ‘ अॅपचे निर्माते मंदार नामजोशी यांनी या उपक्रमांची आणि ‘गणितालय’ या उपक्रमांची माहिती दिली.’अंकनाद’ हे गणिताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणारं अॅप आहे. रोजच्या जगण्यात गणिताला पर्याय नाही . गणित विषय रंजक करुन सांगण्याचे विविध उपक्रम ‘ अंकनाद ‘ तर्फे केले जातात,गणिताची आवड निर्माण केली जाते ,गणितालय उपक्रम ,पाढे पाठांतर स्पर्धा सलग दोन वर्ष घेतल्या जात आहेत ,असे त्यांनी सांगितले. ‘
…………

Latest News