दहा महानगरपालिकांवर प्रशासक नेमण्याच्या हालचालींना सुरुवात…

मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यात बदल करून प्रशासक नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे आणि उर्वरित इतर महानगरपालिकांमध्ये हाच निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार तयारी करत आहे.मुंबई महापालिकेवरती प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुंबई महापालिका सोबतच इतर महत्त्वाच्या नऊ महानगरपालिकांचीही मुदत संपत आहे, आणि त्याही ठिकाणी प्रशासक नेमण्याच्या हालचालींना सुरवात झाली

महानगरपालिकांची मुदत पुढील दोन महिन्यात संपत आहे. या महानगरपालिकांची रणधुमाळी महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची असणार आहे. मात्र ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न आणि प्रभाग रचनेचा मुद्दा हा महाविकास आघाडी सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. म्हणूनच कोरोनाच्या निमित्ताने या दहाही महत्त्वाच्या महानगरपालिका पुढे ढकलण्याच्या तयारीला सुरुवात झालीय आहे.

.या आधीही 2020 मध्ये पाच महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे. यामध्ये औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर या पाच महानगरपालिकांची मुदत संपली आहे. कोरोनाच्या कारणास्तव या पाचही महानगरपालिकावरती राज्य सरकारने प्रशासक नेमला आहे.

आगामी दहा महानगरपालिकांवर प्रशासक नेमण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.जर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असतील आणि देशात पाच राज्यांच्या निवडणुका होत असतील तर या महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका का होऊ शकत नाहीत असा प्रश्न समोर येतोय. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासक नियुक्ती बाबतच्या अध्यादेशाला राज्यपाल परवानगी देणार का? की पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष पाहायला मिळणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Latest News