बन्यान ट्री,टाटा कन्सल्टन्सीतर्फे रविवारी ‘रुहानियत’ कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन

बन्यान ट्री,टाटा कन्सल्टन्सीतर्फे रविवारी ‘रुहानियत’ कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन

पुणे :

‘बन्यान ट्री’संस्थेतर्फे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस च्या सहकार्याने रविवारी ‘रूहानियत’ या संगीतमय मैफिलीचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन येथे रविवार,१३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ही संगीत मैफल रंगणार आहे. त्यात महाराष्ट्रातील गोंधळ(नारायण धोंगडे आणि सहकारी),गुजरातमधील संत रचना(हेमंत चौहान आणि सहकारी),संत कबीर यांच्या रचना(मीर मुख्तियार अली आणि सहकारी),कव्वाली(हिफझूर रहमान आणि सहकारी) हे वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर होणार आहेत.

महेश बाबू यांच्या प्रेरणेतून ‘बन्यान ट्री’ संस्थेच्या वतीने गेली २१ वर्षे ८ शहरातून या संगीत मैफलीचे आयोजन केले जाते.या मैफली म्हणजे संगीत आणि अध्यात्म यांचा उत्कृष्ट मिलाफ असतो.सर्व भेदांच्या पलीकडे नेणारे प्रगल्भ जाणीवा आणि परंपरांचे दर्शन असते.अधिक माहिती www.banyantreeevents.com या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

………….

Latest News