पुणे महापालिका 23 ग्रामपंचायतीमध्ये बोगस नोकरी भरती :- आयुक्त विक्रम कुमार

पुणे: पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या २३ ग्रामपंचायतीमध्ये बोगस नोकरी भरती झाल्याचे स्पष्ट झाली आहे. या तेवीस गावातील ग्रामपंचायतीने बोगस भरती केलेल्या ४६ कर्मचाऱ्यांना पालिकेने कमी केले आहे. या कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचे एकूण वेतन अदा करून त्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले
पालिकेत येण्यापूर्वी समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस कर्मचारी भरती झाल्याचा तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या महापालिकेच्या मुख्य सभेत अनेक नगरसेवकांनी या बोगस कर्मचारी भरती बाबत आवाज उठवला होता त्यावर पालिका प्रशासनाने सावध पवित्रा घेत या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविले होते. दरम्यान कर्मचाऱ्यांची बोगस भरती केल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष्य प्रसाद यांनी चौकशी समिती स्थापन केली चौकशी समिती मध्ये ग्रामपंचायती मध्ये बोगस भरती केल्यावर शिक्कामोर्तबच झाले.
वर्षभरापूर्वी हद्दीवरील तेवीस गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला होता यामध्ये महाळुंगे, सुस, बावधान बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे ,कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नन्हे, होळकरवाडी, औताडे, हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, आणि वाघोली गावाचा समावेश आहे.
शासनाने गावे महापालिकेमध्ये समावेश करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर ग्रामपंचायती मध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बोगस भरती करण्याच्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले मागील वर्षी प्रत्यक्षात गावे समाविष्ट करण्याचा आदेश निघाल्यानंतर महापालिकेने ग्रामपंचायतीचे मालमत्ता व कर्मचारी वर्गीकरण सह सर्व दप्तर ताब्यात घेतले. या चौकशी समितीने या प्रकरणी१४ ग्रामसेवक व २ कृषी विस्तार अधिकार्यांवर ठपका ठेवलाा
या संबंधीचा अहवाल पालिकेला पाठवला होता त्यानुसार पालिका आयुक्तांनी समाविष्ट गावांमधील ग्रामपंचायतीकडून आलेला ४६ कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य शासनाने गावे पालिका मध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण पाडण्याचा कालावधीत राजकीय वरदहस्तामुळे ग्रामपंचायतीवर दबाव आणून बोगस भरती झाल्याचे चौकशीदरम्यान समोर आले आहे.
या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य, साथरोग, नियंत्रक, सफाई कर्मचारी, दिवाबत्ती कर्मचारी, कर वसुली कर्मचारी, चालक आणि पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून अगदी अडीच ते साडे सहा हजार रुपये वेतनावर नेमले होते महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर कर्मचार्यांना अगदी सातवा वेतन आयोगानुसार पाच आकडी पगार होणार होता
महापालिकेने ग्रामपंचायतीकडून ताब्यात घेतलेल्या दप्तरामध्ये ४६ कर्मचाऱ्यांची नावे आढळले नाहीत महापालिकेने ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना महापालिकेमध्ये नेमणूक दिली नव्हती एवढेच नाही तर पूर्वीपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ही वेतन दिले नाही जिल्हा परिषद चौकशी अहवाल महापालिकेला दिला असून त्यानुसार महापालिकेने कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यास सुरुवात केली आहे चौकशी अहवालानुसार तब्बल ४६ कर्मचाऱ्यांची भरती झाल्याचे समोर आल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ४६ कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याचे आदेश दिले आहेत.
यामध्ये बुद्रुक ग्रामपंचायत २७, ग्रामपंचायत जांभुळवाडी काळेवाडी ग्रामपंचायतीतील तीन, हांडेवाडी किरकटवाडी आणि मांगेवाडी ग्रामपंचायतीतील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याच्या समावेश आहे. ४६ कर्मचाऱ्यांमध्ये आठ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.