राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त विविध पुरस्कारांची घोषणा


राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त विविध पुरस्कारांची घोषणा
पिंपरी, प्रतिनिधी :
राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या शशिकलाताई उभे यांना यमुनानगर भूषण पुरस्कार, उद्योजक नाना कोकरे यांना समाजभूषण पुरस्कार, तर प्रा. सोमनाथ नजन यांना विशेष सन्मान म्हणून गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र घोडके यांनी दिली.
प्रतिष्ठानतर्फे वक्तृत्व स्पर्धा, मोफत आरोग्य शिबीर व दंतचिकित्सा शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत निगडी येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथील सावित्रीबाई फुले सभागृहात होणार आहेत.