आझम कॅम्पस आणि संलग्न संस्थांचा एकत्रित शिवजयंती उत्सव,शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय


आझम कॅम्पस आणि संलग्न संस्थांचा एकत्रित शिवजयंती उत्सव , शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णयशिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय
शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’(आझम कॅम्पस ) आणि संलग्न संस्थांच्या वतीने एकत्रितपणे आणि साधेपणाने शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे . दरवर्षी काढण्यात येणारी शिवजयंती अभिवादन मिरवणूक यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,सचिव प्रा. इरफान शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी,हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट,महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर ,गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट ,अवामी महाज या संस्थेचे पदाधिकारी डॉ पी ए इनामदार यांच्या नेतृत्वाखाली १९ फेबुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या आवारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणार आहेत .
गेली १६ वर्षे ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’(आझम कॅम्पस ) च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रेषित महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. संस्थेच्या सर्व शैक्षणिक आस्थापनातील १० हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यामध्ये सहभागी होतात आणि महामानवाचे मानवतेचे संदेशांचा प्रसार करतात. यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अभिवादन मिरवणूक रद्द करण्यात आली आहे.