पिंपरी चिंचवड: भाजपला चिंचवडमधून दुसरा धक्का; चंदा लोखंडे यांचा नगरसेविकापदाचा राजीनामा


पिंपरी चिंचवड: भाजपला चिंचवडमधून दुसरा धक्का; चंदा लोखंडे यांचा नगरसेविकापदाचा राजीनामा
पिंपरी-(परिवर्तनाचा सामना )पिंपरी चिंचवड भाजपला दुसरा राजकीय धक्का बसला असून भाजपच्या नगरसेविका चंदा राजू लोखंडे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा आज आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दिला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांची तारीख जशी जशी जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. सत्ताधारी भाजपला राष्ट्रवादी
काँग्रेस धक्क्यावर धक्के देऊ लागले असून आज सत्ताधारी भाजप व भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बालेकिल्ल्यातील नगरसेविका चंदा राजू लोखंडे यांनी आज आपल्या नगरसेवक पदाच राजीनामा दिल्याने खळबळ माजली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजून किती धक्के देणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये विचारला जाऊ लागला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोनाफोनी करुन भाजप नगरसेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरी, भाजपची गळती थांबताना दिसत नाही. पिंपळेगुरव प्रभाग क्रमांक 29 चे महापालिकेत प्रतिनिधीत्व करत असलेल्या चंदा लोखंडे यांनी आज (सोमवारी) नगरसेविकापदाचा राजीनामा दिला. आयुक्त राजेश पाटील यांनी तो राजीनामा स्वीकारला. त्यामुळे भोसरीपाठोपाठ आता भाजपला चिंचवडमधून दुसरा धक्का बसला आहे.
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपला गळती सुरु झाली आहे. चार दिवसांपूर्वी मोशीचे वसंत बोराटे यांनी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन मनगटावर घड्याळ बांधले आहे. आता चिंचवड विधानसभा मतदारसंघातील चंदा लोखंडे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन भाजपला दुसरा धक्का दिला. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत पिंपळेगुरव, वैदूवस्तीमधून लोखंडे भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. त्यांनी महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपदही भूषविले.