भारती विद्यापीठ आयएमईडी तर्फे ‘सी – गुगली टेक्निकल कॉम्पिटिशन’

पुणे :भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) तर्फे ‘सी – गुगली २०२२ इंटर कॉलेजिएट टेक्निकल कॉम्पिटिशन’ चे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी रोजी ही कॉम्पिटिशन ऑनलाईन स्वरुपात होईल. पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित या स्पर्धेची नाव नोंदणी देखील क्यू आर कोड द्वारे होत आहे.

भारती विद्यापीठ आयएमईडीचे संचालक डॉ सचिन वेर्णेकर , डॉ. अजित मोरे ( इनचार्ज डायरेक्टर एमसीए ) यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या स्पर्धांमध्ये कोड बूस्टर, वेब डिझाईन, माईन क्राफ्ट, टेक आयडिया अशा ४ तांत्रिक प्रकारांचा समावेश आहे. देशभरातून विविध महाविद्यालयातून विद्यार्थी सहभागी होणार आहेत. डॉ.हेमचंद्र पाडळीकर, तसेच एमसीए विभागाचे प्राध्यापक संयोजन करणार आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे दिली जाणार आहेत.

………………………………………

Latest News