प्रशासनाच्या आश्वासनाने महु येथील बेमुदत सत्याग्रह ची सांगता


पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेच्या मागण्यांवर आश्वासन

पुणे :

महू (मध्य प्रदेश ) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन करणाऱ्या डॉ.आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने नवी स्मारक समिती स्थापन करुन स्मारकाचे व्यवस्थापन सोपवल्याने ,संघ परिवाराचा कब्जा केला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने स्मारक वाचविण्यासाठी पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रा १९ फेब्रुवारी दरम्यान काढण्यात आली.

संयुक्त संविधान बचावो कृती समिती,भीम जन्मभुमी बचावो कृती समिती,इनक्रेडिबल समाजसेवक गृप च्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते .

असलम इसाक बागवान​ यांनी यात्रेचे नेतृत्व केले.

१५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता डॉ आंबेडकर पुतळा (रेल्वे स्टेशन ) येथून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. औरंगाबाद,जळगाव,भुसावळ मार्गे महूला ही यात्रा १९ फेब्रुवारी रोजी पोहचली. 20 फेब्रुवारी पासून अहिंसक मार्गाने बेमुदत सत्याग्रहास सुरूवात करण्यात आला.मागणी संदर्भात चौकशी समिती स्थापन करू, असे आश्वासन महू चे उपविभागीय अधिकारी( एस डी एम ) अभिषेक शर्मा यांनी दिले. असलम बागवान, मोहन वाकोडे, यांनी सांगीतले. सचिन आल्हाट, निखिल जाधव उपस्थित होते.

मध्य प्रदेश सरकारने महू येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे व्यवस्थापन करणारी डॉ.आंबेडकर मेमोरियल सोसायटी ही १९७२ साली स्थापित मूळ संस्था बाजुला करुन नवी स्मारक समिती स्थापन करून त्यात संघ विचाराचे सदस्य घुसविण्यात आले आहेत.

असंवैधानिक पद्धतीने ही समिती तयार केली असून डॉ आंबेडकर जन्मभूमीवर कब्जा मिळविणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.याविरोधात भारतभर आंदोलन करण्यात आले. ही यात्रा त्याचाच एक भाग होती.नव्याने स्थापन केलेली समिती रद्द करावी ,अशीही मागणी करण्यात आली .

डॉ.आंबेडकर मेमोरियल सोसायटी या ​ मूळ संस्थेच्या अध्यक्षांचे निधन झाल्यावर काही सदस्यांनी नवे सदस्य बनवून निवडणूक घेतली गेली . त्याविरोधात निबंधकाकडे तक्रार करण्यात आली आहे . या बाबतीत न्यायालयात देखील धाव घेण्यात आली आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली ​. त्या जागी डॉ.आंबेडकर स्मारक समिती ही नवी संस्था स्थापन करून स्मारकाचे संचालन या नव्या संस्थेला देण्यात आले आहे, जे बेकायदेशीर, असंवैधानिक आहे.

Latest News