219 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान मुंबईत दाखल

मुंबई: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या २१९ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं आहे. दुपारी रोमानियाची राजधानी बुचारेस्ट इथून या भारतासाठी उड्डाण केलं होतं.दरम्यान, युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीयांना घेऊन पहिल्या विमानाने रोमानियाहून दुपारी पहिलं विमान मुंबईसाठी रवाना झालं होतं. हे विमान भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल असं सांगण्यात येत होतं. पण ते रात्री ८ वाजेपर्यंत मुंबईत दाखल झालं आहे.

यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री या भारतीयांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर दाखल होणार असल्याच ट्विट काही वेळापूर्वी केलं होतं. गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “युक्रेनमधून सुरक्षितरित्या बाहेर काढलेल्या भारतीयांचं मुंबई विमानतळावर आगमनाची वाट पाहतो आहोत. सरकार सध्या या परिस्थितीत मिशन मोडवर काम करत आहे. भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत

Latest News