१७९ कोटी ९ लाख रुपयांच्या विविध विकासकामांना स्थायी सभेत मंजूरी : ॲड. नितीन लांडगे

nitin-landgae

१७९ कोटी ९ लाख रुपयांच्या विविध विकासकामांना स्थायी सभेत मंजूरी : ॲड. नितीन लांडगे

पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२२) पिंपरी मनपा स्थायी समितीची २६४ क्रमांकाची बैठक सोमवारी (दि. २८ फेब्रुवारी) ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती ॲड. नितीन लांडगे होते. या बैठकीत १७९ कोटी ९ लाख रुपयांच्या विविध विकासकामांना मंजूरी देण्यात आली. विषय पत्रिकेवरील एकूण ३६ विषयांपैकी ३५ विषय आणि ऐनवेळचे ५० विषय अशा एकूण ८५ विषयांना या बैठकीत मंजूरी देण्यात आली. ११५ कोटी ९९ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजूरी देण्यात आली. याशिवाय पीएमपीएमएलला २७ कोटी ५४ लाख रुपये संचलन तूट देण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणातून ६०.७९ द.ल.घ.मी. मंजूर बिगर सिंचन पाणी आरक्षण पोटी सिंचन पुर्नस्थापना खर्चाचा दुसरा हप्ता ३५ कोटी ५५ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कम अदा करण्यासही मान्यता देण्यात आली. अशा एकूण १७९,०९,७६,५१८/- रुपयांच्या विषयांना मंजूरी देण्यात आली अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.————-

Latest News