पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय, अध्यक्षपदाचा निर्णय राखून ठेवला


पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय
अध्यक्ष पदाचा निर्णय राखून ठेवला आहे
पिंपरी ( दि. 27 फेब्रुवारी 2022) पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे 18 उमेदवार निवडून आले आहेत. गावडे पॅनेलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांना एकूण 2534 मते मिळाली
तर त्यांच्याविरुद्ध उभे राहिलेले अंबर चिंचवडे यांना 2525 मते मिळाली आहेत. परंतु अंबर चिंचवडे यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी अध्यक्ष पदाचा निर्णय राखून ठेवला आहे.
शुक्रवारी ( दि. 25 फेब्रुवारी) मतदान झाले यानंतर सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली मतमोजणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे 10 पैकी 8 पदाधिकारी निवडून आले. तर कार्यकारणी सदस्य पदासाठी एकूण पंधरा जागांपैकी दहा उमेदवार निवडून आले. तर आपला महासंघ पॅनेलचा सुप्रिया सूरगुडे यांनी उप अध्यक्ष पदासाठी 2616 मते मिळवून विजय मिळवला.
चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे 25 पैकी 18 उमेदवार निवडून आले.
सविस्तर निकाल पुढील प्रमाणे उपाध्यक्षपदासाठी मनोज माछरे यांना 2682, महादेव बो यांना 2608, सरचिटणीस पदासाठी अभिमान भोसले यांना 2683, चिटणीस पदासाठी मंगेश कलापुरे यांना 2615, सहसचिव पदासाठी उमेश बांदल यांना 2665, कोषापाल पदासाठी नितीन समगिर यांना 2640, संघटक पदासाठी शुभांगी चव्हाण यांना 2702, मुख्य संघटक पदासाठी दिगंबर चिंचवडे यांना 2615 मते मिळाली आहेत.
अध्यक्ष पदाचा निर्णयाबाबत निवडणूक अधिकारी तुकाराम जाधव सोमवारी माहिती देणार आहेत.पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय अध्यक्ष पदाचा निर्णय राखून ठेवला आहे पिंपरी ( दि. 27 फेब्रुवारी 2022) पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे 18 उमेदवार निवडून आले आहेत. गावडे पॅनेलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांना एकूण 2534 मते मिळाली तर त्यांच्याविरुद्ध उभे राहिलेले अंबर चिंचवडे यांना 2525 मते मिळाली आहेत. परंतु अंबर चिंचवडे यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी अध्यक्ष पदाचा निर्णय राखून ठेवला आहे. शुक्रवारी ( दि. 25 फेब्रुवारी) मतदान झाले यानंतर सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली मतमोजणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे 10 पैकी 8 पदाधिकारी निवडून आले. तर कार्यकारणी सदस्य पदासाठी एकूण पंधरा जागांपैकी दहा उमेदवार निवडून आले. तर आपला महासंघ पॅनेलचा सुप्रिया सूरगुडे यांनी उप अध्यक्ष पदासाठी 2616 मते मिळवून विजय मिळवला. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे 25 पैकी 18 उमेदवार निवडून आले. सविस्तर निकाल पुढील प्रमाणे उपाध्यक्षपदासाठी मनोज माछरे यांना 2682, महादेव बो यांना 2608, सरचिटणीस पदासाठी अभिमान भोसले यांना 2683, चिटणीस पदासाठी मंगेश कलापुरे यांना 2615, सहसचिव पदासाठी उमेश बांदल यांना 2665, कोषापाल पदासाठी नितीन समगिर यांना 2640, संघटक पदासाठी शुभांगी चव्हाण यांना 2702, मुख्य संघटक पदासाठी दिगंबर चिंचवडे यांना 2615 मते मिळाली आहेत. अध्यक्ष पदाचा निर्णयाबाबत निवडणूक अधिकारी तुकाराम जाधव सोमवारी माहिती देणार आहेत.