रशियाला खरच गंभीरपणे चर्चा करायची असेल तर त्यांना चर्चेचे ठिकाण बदलावे- वोल्दिमीर झोलेन्स्की


युक्रेनने आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्याने रशियाने आणखी आक्रमक भूमिका घेतली. रशियन सैन्याने युक्रेनमधील दुसरे सर्वात मोठे शहर खारकीवमधील गॅस पाईपलाईन उडवून दिली. रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा अवघ्या काही तासांमध्ये रशियाचे सैनिक युक्रेनची राजधानी कीव्हवर कब्जा करतील, अशी चचर्चा होती.
कीव्हला रशियाच्या लष्कराने चारी बाजुंनी वेढा दिला आहे. तरीही शस्त्र टाकण्यास युक्रेनच्या सैनिकांनी शस्त्र टाकण्यास नकार देत रशियाच्या सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले. आता ७२ तासांनंतरही ते रशियाच्या सैन्याचा मुकाबला करत आहेत. रशियानेच त्यांच्या चर्चेचा प्रस्ताव ठेवत आपले एक शिष्टमंडळ बेलारुसला पाठवले आहे.रशियाने युक्रेनवर हल्ला करत राजधानी कीव्हला चारी बाजूंनी वेढा दिला आहे. ( Ukraine and Russia ) रशियासमोर झुकणार नाही, असे स्पष्ट करत युक्रेनने संघर्ष सूरुच ठेवला आहे. आता रशियाकडून चर्चेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
चर्चेसाठी बेलारुसला एक शिष्टमंडळ पाठवले आहे. मात्र युक्रेनने रशियासमोर चर्चेपूर्वी आपली अट ठेवली आहे.मीडिया रिपार्टनुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी बोलारुस येथे चर्चेस नकार दिला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, बेलारुसचा वापर रशिया एका लष्करी तळाप्रमाणे करत आहे. या ठिकाणी आम्ही चर्चा करु शकत नाही. रशियाला खरच गंभीरपणे चर्चा करायची असेल तर त्यांना चर्चेचे ठिकाण बदलावे लागेल. त्यांनी या चर्चेसाठी पोलंड, तुर्की हंगेरी, अजरबैजान, स्लोवाकिया येथे रशियाने आपले शिष्टमंडळ पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे युक्रेनकडून रशियाला चोख प्रत्युत्तर मिळत आहे.
७२ तासांनंतरही रशियन सैन्याला कीव्हवर कब्जा करता आलेला नाही. आता रशियाने विनाअट चर्चेची तयारी दर्शवली आहे. युक्रेनचे सैनिकांनी शरणागती पत्करल्यानंतरच चर्चा होईल, अशी अट रशियाने ठेवली होती. मात्र ही अट धुडकावत आम्ही शस्त्र टाकणार नाही, कोणत्याही परिस्थिती झुकणार नाही, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झोलेन्स्की यांनी रशियाला ठणकावले होते. आता त्यांनी बेलारुस येथे चर्चा नको, ही त्यांची अट रशिया मान्य करणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.