भाजपा चा भ्रष्टाचार आणि आमदारांच्या मनमानीला कंटाळून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका माया बारणे यांच्या राजीनामा,

पिंपरी (परिवर्तनाचा सामना ) महापालिका निवडणूक दीड महिन्यांत होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. त्या पार्श्वभूमिवर भाजपा नगरसवेकांचे राजीनामा सत्र सुरू आहे. भाजपा सोडणाऱ्या नगरसेवकांनी दोन्ही आमदारांवर खापर फोडले आहे. आमदारांच्या मनमानी, हुकूमशाहीवर हे नगरसेवक नाराज आहेत. भाजपाच्या नगरसेविका माया बारणे यांनी पक्षातील गटतट, भ्रष्टाचार आणि आमदारांच्या मनमानीला कंटाळून अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, अभय मांढरे, सचिन बारणे, ऋषिकेश काशिद, विराज बारणे आदी उपस्थित होते.

भाजपाला लागलेली गळती रोखण्यासाठी वरिष्ठ नेतेमंडळींचा आटापीटा सुरू आहे, पण त्यांना यश मिळताना दिसत नाही.


माया बारणे यांच्या राजीनामा हा महत्वाचा समजला जातो. त्यांचे पती माजी नगरसवेक संतोष बारणे यांनीही भाजपा सोडला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार प्रयत्न करूनही पिंपरी चिंचवड भाजपाला लागलेली गळती थांबायला तयार नाही.

नगरसेवक वसंत बोराटे यांनी राजीनामा देत आमदार महेश लांडगे यांना धक्का दिला, तर पाठोपाठ दुसरे नगरसेवक तुषार कामठे यांनी आणि लगेचच नगरसेविका चंदा लोखंडे यांनी राजीनामा देऊन आमदार लक्ष्मण जगताप यांना झटका दिल्याने भाजपा गोटात मोठी खळबळ उडाली. सुमारे २२ नगरसेवक भाजपा सोडून राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत असल्याची वार्ता आहे. आता माया बारणे यांनीही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत पक्ष सोडल्याने राजकिय वातावरण तापले आहे.माया बारणे या थेरगावमधून दुसऱ्यांदा नगरसेविका होऊनही त्यांना पाच वर्षांत एकही महत्वाचे पद मिळाले नाही. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्वाच्या पदांचे आश्वासन दिले पण जाणीवपूर्वक त्यांना डावलले गेले. माया बारणे यांनी भाजपाच्या नेत्यांवर खापर फोडले आहे. महापालिकेतील आमदारांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल माया बारणे यांच्यासह नगरसेवक तुषार कामठे यांनी तुफानी हल्ला चढविल्याने राजकारण तापले आहे. तिसरीकडे भोसरीतून बिनविरोध भाजपा नगरसेवक झालेले रवि लांडगे यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या गैरकारभार आणि हुकूमशाही कारभाराबद्दल माध्यमांतून आरोप केल्याने भाजपा त्रस्त आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नगरसेवकांना स्वतः फोन केला आणि सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतरही भाजपाचे नगरसवेक पक्ष सोडत असल्याने दोन्ही आमदारांवर निष्ठावंत गटासह सर्वांची नाराजी वाढत आहेपिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचा भ्रष्ट, हुकूमशाही कारभार सुरू आहे. लाच प्रकरणी अटक झालेल्या स्थायी समिती अध्यक्षावर भाजपने कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्याचे समर्थन केले. हे शहराचे दुर्दैव असून भाजप पदाधिकारी भ्रष्टाचाराला साथ देतात हे स्पष्ट होते. महासभेत विचारण्यासाठीचे लेखी प्रश्न महापौरांकडून प्रश्न स्वीकारले जात नव्हते. भाजपच्या हुकूमशाही, भ्रष्ट कारभाराला कंटाळून भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याचे माया बारणे यांनी सांगितले.