युक्रेनमध्ये सुरु असलेला नरसंहार थांबवा : पाहिजे- धर्मगुरु पोप फ्रान्सिस

रशियाचे अध्यक्ष ब्लिदिमिर पुतीन यांना आवाहन करताना पोप फ्रान्सिस म्हणाले, युक्रेनमधील हा नरसंहार थांबायला पाहिजे. शहरांची दफनभूमी होऊ देऊ नका. युक्रेनमध्ये सुरु असलेलं सशस्त्र आक्रमण कुठल्याही परिस्थितीत स्वाकारार्ह नाही. रविवारी सेंट पिटर्स स्वेअरमध्ये हजारो लोकांसमोर बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. रशियाकडून लहान मुलांच्या रुग्णालयांवर आणि नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांना त्यांनी रानटी प्रकार असं संबोधलं आहे. या परिस्थितीला कोणतंही धोरणात्मक कारण नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणावर ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी कठोर शब्दात टिपण्णी केली आहे. युक्रेनमध्ये सुरु असलेला नरसंहार थांबला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या या युद्धजन्य परस्थितीवर जागतीक स्तरावरील अनेक बड्या व्यक्तींनी रशियाच्या कारवाईला कडाडून विरोध केला आहे.युक्रेनमधील विविध रुग्णालये

, धार्मिकस्थळं आणि नागरी वस्त्यांमध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर पोप यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. युक्रेनमधील मारीयुपोल हे शहर सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांपैकी एक आहे. या ठिकाणी सध्या अन्न, पाणी आणि औषधांचा पुरवठा केला जात आहे. तसेच हल्ल्यांचा धोका निर्माण होऊ नये म्हणून इथल्या लोकांना बाहेर काढण्याासाठी प्रयत्न केले जात आहेत.