सर्वोदय सद्भावना संकल्प यात्रेतील यात्रेकरूंचा पुण्यात निरोप समारंभ . मोहन जोशी यांच्या हस्ते असलम बागवान यांचा सत्कार


सर्वोदय सद्भावना संकल्प यात्रेतील यात्रेकरूंचा पुण्यात निरोप समारंभ
………………..
मोहन जोशी यांच्या हस्ते असलम बागवान यांचा सत्कार
पुणे :
पंचायतराज व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने काढण्यात येणाऱ्या सर्वोदय सद्भावना संकल्प पदयात्रेस निघालेल्या असलम बागवान यांच्या नेतृत्वाखालील पुण्यातील कार्यकर्त्यांना शनिवारी फुलेवाडा येथे झालेल्या कार्यक्रमात निरोप देण्यात आला.
ही पदयात्रा पोचमपल्ली ( तेलंगणा ) ते सेवाग्राम दरम्यान ३६ दिवस प्रवास करणार आहे. १४ मार्च ते १८ एप्रिल २०२२ असे या पदयात्रेचे नियोजन आहे. पुण्यातून २० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रसार केला जाणार आहे.
महात्मा फुले वाडा (समता भुमी) संकल्प यात्रेला पुणे शहरातील विविध सामाजिक संघटना यांचे कार्यकर्ते यांनी आपल्या शुभेच्छा आणि पाठिंबा दर्शवित निरोप दिला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी,जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय समिती च्या सुनिती सु.र. , विनय र .र., अॅड. संतोष म्हस्के. मुलनिवासी मुस्लिम मंचचे संस्थापक अध्यक्ष अंजुम इनामदार, एन ए पी एम चे महाराष्ट्र समन्वयक युवराज गटकळ,पश्चिम महाराष्ट्र समन्वयक इब्राहीम खान, युक्रांदचे सुदर्शन चखाले,वंचित बहुजन आघाडी चे ओंकार मोरे ,राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय सचिव शेर अली,इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे महाराष्ट्र अध्यक्ष बशिर सय्यद,भीमरत्न विचार मंचचे अशोक सोनावणे सर. महाराष्ट्र उप अध्यक्ष कवाडे, मुस्लिम फ्रंट चे अल्ताफ भाई,नितीन बसरूर, डॉ. सुर्यवंशी, अन्वर बागवान,