दकनी अदब फाऊंडेशन’ आयोजित ‘एक शाम साहिर के नाम ‘ कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद

IMG-20220313-WA0091

*पुणे :’दकनी अदब  फाऊंडेशन ‘ आयोजित ‘ महफिल – ए -शेर  : एक शाम साहिर के नाम ‘ या  साहिर लुधियानवी या  प्रख्यात  गीतकाराच्या १०१ व्या  जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित हिंदी उर्दू मुशायऱ्यास शनीवारी सायंकाळी  चांगला प्रतिसाद मिळाला. हा मुशायरा जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रस्ता येथे पार पडला.या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी बहारदार शेरोशायरी,गजल सादर केल्या.कोविड साथीनंतर नंतर पुण्यामधे ‘दकनी अदब  फाऊंडेशन ‘ आयोजित हा पहिलाच मुशायरा कार्यक्रम असल्याने उपस्थित रसिकांनी त्याचा आनंद लुटला !नामवंत कवी राजेश रेड्डीनी दिवंगत गजलगायक जगजीतसिंह यांच्याही  आठवणींना उजाळा देत आजच्या परिस्थितीवर भाष्य  करणाऱ्या मार्मिक ग़ज़लांनी रसिकांची मने जिंकली. ” सर क़लम होंगे कल यहाँ उन के जिन के मुँह में ज़बान बाक़ी है ” ” किसी दिन ज़िंदगानी में करिश्मा क्यूँ नहीं होतामैं हर दिन जाग तो जाता हूँ ज़िंदा क्यूँ नहीं होता ” तर मोनिका सिंह यांनी त्यांच्या वैविध्यपूर्ण ग़ज़लांनी श्रोत्यांची वाहवा मिळवली . ” यहां बुझने का डर भी है यहां जलने की शर्तें भी चरागों को मगर बहती हवा से दुश्मनी न थी” “सबसे मिलकर भी हम अजनबी से रहेहमको अपनों ने  अक्सर अकेला किया ” तसेच इरफान शाहनूरी यांनी ‘लेक वाचवा’ सारख्या विषयावर अत्यंत संवेदनशील कविता सादर केली. ओबेद आझमी, इरफान जाफरी , डॉ. समीर कबीर, सुनयना काचरू, अनंत नांदुरकर खलिश, शिखा पचौली या सर्व कवींनी आपल्या विविध रचना  सादर करून हा मुशायरा गाजवला.प्रवेश विनामूल्य होता. ………………………….. 

Latest News