PM मोदी म्हणाले, ‘देशात द काश्मीर फाइल्ससारखे सिनेमे बनायला हवेत…

नवी दिल्ली परिवतर्नाचा सामना : अलीकडेच भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमावर भाष्य केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या बैठकीत पीएम मोदी म्हणाले की, ‘देशात द काश्मीर फाइल्ससारखे सिनेमे बनायला हवेत. अशा सिनेमातून सत्य जनतेसमोर येतं.गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणलं जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते लोक आज या चित्रपटाला विरोध करत आहेत.’ असं विधान करत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचं नाव न घेता निशाना साधला आहे.

‘The Kashmir Files’ च्या प्रमोशनला कपिलने दिलेला नकार?अनुपम यांनी उघड केलं सत्य अभिषेक अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही फोटो पोस्ट केले आहेत.मागील काही दिवसांपासून देशात ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चांगलाच गाजत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून राजकीय वातावरण देखील तापलं असून यावर संमिश्र प्रतिक्रिया उमठत आहेत.या चित्रपटाला अनेकांनी विरोध देखील दर्शवला आहे. या चित्रपटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मोठं विधान केलं आहे.

देशात ‘द काश्मीर फाइल्स’सारखे सिनेमे बनायला हवेत. अशा चित्रपटातून सत्य जनतेसमोर येत असतं, असं मोदींनी म्हटलं आहे.

‘हे अनैतिक आहे’, द कश्मीर फाइल्सचं IMDb रेटिंग घसरल्याने भडकले विवेक अग्निहोत्री अग्रवाल यांचे ट्वीट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील रीट्विट केले आहे. त्यांनी यावेळी असे म्हटले आहे की, मला तुमच्यासाठी खूप आनंद झाला आहे अभिषेक अग्रवाल. भारताचे सर्वात आव्हानात्मक सत्य मांडण्याचे धाडस तुम्ही दाखवले आहे. USA मधील #TheKashmirFiles स्क्रिनिंगने पीएम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगाचा बदलता मूड सिद्ध केला.’ ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाबाबत बोलायचं झालं तर हा सिनेमा काश्मिरी पंडितांवर आधारीत आहे. 90 च्या दशकात काश्मिरी पंडिंतांवर झालेले अत्याचार आणि त्यांच्या झालेल्या हत्या यावर आधारीत हा सिनेमा आहे. या सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक अशी तगडी स्टार कास्ट आहे. सोशल मीडियावर देखील या सिनेमाच्या ट्रेलरच्या क्लिप्स व्हायरल होत आहेत.11 मार्च रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

यावेळी त्यांनी अशा आशयाचं ट्वीट केलं आहे की, ‘माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना भेटून आनंद झाला. #TheKashmirFiles बद्दलचे त्यांचे कौतुक आणि चांगले शब्द यामुळे ही भेट खास ठरली. याआधी कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करताना एवढे अभिमानास्पद वाटलं नव्हतं.’ त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी देखील दिसत आहेत.

Latest News