धक्काबुक्की मुळे महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग झाल्याने परिस्थिती बिघडली : पत्रकार परिषदेत समोर आली दुसरी बाजू……………..क्लाईन मेमोरियल स्कुलवर फी माफीसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय :शाळेचे स्पष्टीकरण


धक्काबुक्की मुळे महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग झाल्याने परिस्थिती बिघडली : पत्रकार परिषदेत समोर आली दुसरी बाजू……………..क्लाईन मेमोरियल स्कुलवर फी माफीसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय :शाळेचे स्पष्टीकरण
पुणे :क्लाईन मेमोरियल स्कूलमध्ये काही पालक सातत्याने वर्षानुवर्षे शालेय शुल्कामध्ये अवाजवी सवलतीसाठी दबाव आणत असल्याने ९ मार्चला धुडगूस घालताना धक्काबुक्कीदरम्यान महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग झाल्याने परिस्थिती बिघडली , असे स्पष्टीकरण आज पत्रकार परिषदेत देण्यात आले.शाळेच्या प्राचार्य सौ. सुनंदा सिंग, शाळेचे कायदेविषयक सल्लागार मार्कस देशमुख यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.९ मार्चला शाळेत आठवी इयत्तेतील पालक सभा होती. तरीही इतर पालक येऊन फी सवलतीसाठी घोषणाबाजी करू लागले.पुरुष सुरक्षा रक्षकांना मारण्याचाही प्रयत्न झाला. कारण नसताना घोषणाबाजी झाली. १२ मार्चला असाच प्रकार झाला.सुरक्षितता हाच सुरक्षा रक्षक नेमण्याचा उद्देश होता. पुण्यात विद्यार्थिनींवर चाकूहल्ला होत असल्याचे आपण नुकतेच पाहिले आहे. त्या पाश्र्वभूमीवर आम्ही सुरक्षिततेची काळजी घेत आहोत, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पालकांच्या गोंधळाची आणि आमच्यावर आणलेल्या दबावाबद्दल त्याच दिवशी आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे. कोरोना साथीत 104 मुलांना फी सवलत दिलेली आहे . या वर्षी ९४ मुलांना फी सवलत दिलेली आहे.संबंधित काही पालक ५ लाख फी भरू शकले नाहीत, तेच दबाव आणत आहेत. त्यांचे अर्ज व्यवस्थापनाकडे देऊ असे आम्ही सांगीतले होते.धुडगूस घालण्याची ही घटना पूर्वनियोजित आहे. त्याचे फुटेज आम्ही पोलिसाना देऊ. व्हीडीओचा पहिला महिला सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की झाल्याचा, विनयभंग झाल्याचा अर्धा भाग माध्यमांना संबंधित पालकांनी दाखवला नाही. संबंधित महिला बाऊन्सर ला धक्काबुक्की केल्याने, प्रायव्हेट पार्टना हात लावल्याने ती महिला सुरक्षा रक्षक चिडली, हेही तितकेच खरे आहे.सर्व क्षेत्रात सुरक्षा रक्षक, बाऊन्सर नेमले जातात. नेत्यांना, मंत्र्यांना बाऊन्सर असतात, तरीही इथुन पुढे बाऊन्सर्स न नेमण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.या प्रकरणात शाळेवर कारवाई करू, असे राज्य सरकारमधील काही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसे झाल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले………………..