रोटरी जलोत्सव २०२२’ चे उदघाटन ————–नद्यांच्या मरणासन्न अवस्थेबद्दल सरकारला प्रश्न विचारा :राजेंद्रसिंह ———-

IMG-20220316-WA0230

‘————- नदीला मानवी दर्जा द्या,जलधोरण ठरवा:राजेंद्रसिंह

पुणे :’नद्या सुधारणेसाठी साठी करोडो रुपयांचे आकडे जाहीर होत असले तरी नद्यांच्या मरणासन्न अवस्थेबद्दल आपण न घाबरता सरकारला प्रश्न विचारा,जलधोरणाद्वारे नदीला मानवी दर्जा द्या,सांडपाणी सोडणे बंद करा,नद्यांची जमीन हिरावून घेऊ नका,चुकीची धोरणे थांबवा,जिथे चुकीची कामे चालू आहेत तिथे सत्याग्रह करावा’,असे आवाहन ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ राजेंद्रसिंह यांनी बुधवारी रात्री केले.

रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ आयोजित रोटरी जलोत्सव-२०२२ चे उदघाटन ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी ऑनलाईन प्रणालीद्वारे झाला.विकिपीडियामध्ये रिव्हर पीडिया द्वारे नद्यांची माहिती देण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. उद्घटनाप्रसंगी प्रांतपाल पंकज शहा,नियोजित प्रांतपाल डॉ.अनिल परमार,रोटरी क्लब पुणे हिलसाईडचे अध्यक्ष संजय डोळे,संयोजक सतीश खाडे,पर्यावरण तज्ज्ञ केतकी घाटे,जलोत्सवाचे सहसंयोजक रवी उलंगवार,रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोडच्या अध्यक्ष अनुराधा काळे,अभय जबडे उपस्थित होते.पूजा गिरी यांनी सूत्रसंचालन केले.

रोटरी क्लब ३१३१ आणि एच व्ही देसाई महाविद्यालयाने संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले. राजेंद्रसिंह म्हणाले,’सर्व नद्या वेगळ्या आहेत. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. भारतात नद्या आजारी आहेत.यमुना,मिठी,अशा आर्थिक राजधान्यांची नद्या या नाले बनत आहेत.शिक्षित समाज असलेल्या ठिकाणी नद्या जास्त प्रदूषित झाल्या आहेत.नद्याचा आक्रोश ऐकला पाहिजे.नद्यांचे नाते समुदायाच्या आक्रोशाशी आहे.

भारतातील अर्ध्या नद्या सुकल्या आहेत.जीवनशैलीतील बदलाने नद्यांचा आक्रोश वाढला आहे.जलवायू परिवर्तन हे समाजातील,जीवनशैलीतील बदलाने झाला आहे.नद्यांना समजून त्यांच्यासोबत जगणे आपण शिकले पाहिजे.नद्या शुद्ध करणे आपल्या हाती आहे.आज नद्यांमध्ये आपण हात धुवू शकत नाही,पाय टाकू शकत नाही,पाणी पिऊ शकत नाही

.सुकलेल्या मरणासन्न नद्यांना पुनर्जीवित केले पाहिजे.चर्चापरिसंवादाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कामात उतरले पाहिजे.देशभर नद्यांशी प्रेमभरा संवाद झाला पाहिजे.नद्यांची जमीन नदीसाठीच राहिली पाहिजे.सर्व सरकारे,व्यवस्था सांडपाणी नद्यांत टाकत आल्या आहेत.त्यमुळे आपण सरकारला प्रश्न विचारून नद्यांच्या हत्यांबद्दल प्रश्न विचारले पाहिजेत.नद्यांसाठी धोरण निश्चित होऊ शकत नाही,यासाठी भ्रष्टाचार कारणीभूत आहे.नद्याजोड प्रकल्पाने कंपनीकरण होईल असा इशारा त्यांनी दिला.

विकिपीडियातील रिव्हरपीडियाद्वारे नदी साक्षरता वाढावी,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. रोटरीने पोलिओ सारख्या बाबतीत यशस्वी काम केले आहे.त्यात सर्वंकष दृष्टिकोन ठेवून जनजागृती करावे,नदी साक्षरता वाढवावी,असे आवाहन डॉ. राजेंद्रसिंह यांनी केले.केतकी घाटे म्हणाल्या,’पाणी कायमस्वरूपी हवे असेल तर निसर्ग चक्राची काळजी घेतली पाहिजे.बहुतांशी जंगले उजाड झाली आहेत. शेती वाढली तर ती भूजलावर अवलंबून आहे.उपसा वाढला तरी पाणी आटत आहे.खतांचा वापर वाढला आहे.पुनर्भरण आणि पुनरुज्जीवनावर भर दिला पाहिजे.मानवाने पर्यावरणीय दृष्टिकोन वाढवला पाहिजे. प्रांतपाल पंकज शहा म्हणाले,’रोटरी क्लबने पर्यावरण संवर्धनासाठी नेहमीच योगदान दिले आहे.

वॉटर फेस्टिव्हल मुळे जलसाक्षरता निर्माण व्हायला मदत होईल.सुबोध कुलकर्णी यांनी विकिपीडिया नद्यांविषयी जास्तीत जास्त माहिती,फोटो देण्यासाठी अभियान केले जावे यासाठी मार्गदर्शन केले. रोटरीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन ही चळवळ होईल असा प्रयत्न करूया,पर्यावरणाची काळजी घेऊया’, असे आवाहन रोटरी ३१३१ चे नियोजित प्रांतपाल डॉ परमार यांनी केले.प्रतीक्षा घोरपडे यांनी आभार मानले.होळीच्या सुट्टीनंतर पुढील कार्यक्रम होतील.

जलोत्सवातील पुढील सत्रे ————————१८ मार्च :जमिनीतील पाणी :राहुल बाक्रे१९ मार्च :अजित गोखले :पाणी प्रदूषण२० मार्च :अनिरुद्ध अडसूळ :समुद्रातील परिसंस्था,मरीन इको सिस्टीम २१ मार्च :राघव खडककर :जलक्षेत्रांतील संधी २२ मार्च :प्रा .डॉ .विजय परांजपे :क्लायमेट चेंज ……………………………………….

Latest News