शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव यंदापासून शासकीय पातळीवर साजरा होणार..


किशोर चव्हाण व रामभाऊ जाधव यांची माहिती
पुणे, परिवर्तनाचा सामना प्रतिनिधी : स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची 428 वी जयंती वेरुळ येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यंदापासून जयंती महोत्सव शासकीय पातळीवर साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त 15 ते 25 मार्च दरम्यान प्रत्येक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठात जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. 17 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता वेरुळच्या गढीवर दीप महोत्सव घेण्यात येणार आहे. यंदाच्या महोत्सवाची सुरुवात वेरुळ येथे येत्या 20 मार्च रोजी नागपूर घराण्याचे मुधोजीराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी दिली.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत यंदा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सव समितीचे अध्यक्ष विजय घोगरे यांच्या हस्ते वेरुळ येथील गढी येथे ध्वजवंदन होणार आहे. तसेच व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले आहे. यावेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, खासदार डॉ. भागवत कराड, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
जयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी अभियंता विजय घोगरे, स्वागताध्यक्ष आमदार प्रशांत बंब, विलास पांगारकर, तानाजी हुस्सेकर, डॉ. त्र्यंबक पाटील, प्रा. आर.एम. दमगीर पाटील, राजेंद्र दाते, मनोज आखरे, प्रकाश मिसाळ, राजेंद्र पवार, उपाध्यक्ष योगेश केवारे, अशोक वाघ, डॉ. उद्धव काळे, अभियंता डॉ. प्रवीण जाधव, प्रा. रामकिसन पवार, धनंजय पाटील, रमेश गायकवाड, सिद्धार्थ दाभाडे, योगेश ढेरे, शंकर मिसाळ, सरचिटणीस नाना कदम, ज्ञानेश्वर ढोबळे, माधव अवरगंड, सुभाष जावळे, आत्माराम शिंदे, एम.एम. खुटे, अॅड. शिवराज कड, अंकुश शिंदे, रवींद्र वाहटुळे, शिवाजी ढोबळे, गणपतराव म्हस्के, क्षीरसागर, कोषाध्यक्ष अशोक खानापुरे, महिला समिती अॅड. वैशाली कडू, रेखा वाहटुळे, प्रा. मनिषा मराठे, वैशाली डोळस, कल्पना चव्हाण, नीता पाटील, सुकन्या भोसले, छाया मोडेकर, हेमा पाटील, डॉ. विमल मापारी, अॅड. सुवर्णा मोहिते, प्रतिभा जगताप, डॉ. शिल्पा पाटील, संगीता तुपे आदी.