प्रभाग क्र. १९,२० मधील मूलभूत समस्यांचे तातडीने निराकरण करा:सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत १३ मार्च पासून प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासकीय कामकाज सुरू केली.आज आठ हि क्षेत्रिय कार्यालयामध्ये जनसभा आयोजित करण्यात आली होती. अ क्षेत्रीय कार्यालयात श्री श्रीकांत सवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही जनसभा आज संपन्न झाली.

या सभेसाठी मी उपस्थित राहून.नव्याने रचना केलेल्या प्रभाग क्र.१९व प्रभाग क्र२० मधील मोहननगर,महात्मा फुलेनगर,इंदिरानगर,आनंदनगर, साईबाबानगर,अण्णासाहेब मगरनगर, चिंचवड स्टेशनगवळीवाडा,पोलीस लाईन, प्रेस्टिज सोसायटी,गावडे कॉलनी चिंचवड स्टेशन तसेच काळभोरनगर,रामनगर,दत्तनगर, विद्यानगर,शंकरनगर, परशुरामनगर,खडीमशीन आदी परिसरातील पुढील समस्या मांडल्या.

१) या वरील सर्व विभागांमध्ये काही रस्त्यांचे डांबरीकरण झाले. मात्र काही अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण तसेच प्रलंबित आहे ते व्हावे.२) या विभागातील परिसरात सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक काही भागात नवीन तर काही भागात जुने बसवण्यात आले आहेत.ते बसवताना टेंडरच्या अटी शर्तीनुसार दर्जेदार बसवावेत.३) या विभागातील नाल्यांची दुरवस्था झाली असून हे नाले दुरुस्त करण्यात यावेत.४) मोहननगर येथील पंतप्रधान आवास योजना प्रकल्पा समोरील सोसायटीतल्या शेजारच्या जागेत नाल्याचे व पावसाचे पाणी आत घुसते. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचे निवारण व्हावे.५) रामनगर कडून मोहन नगरकडे येणाऱ्या रस्त्याची काम रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. हे काम दर्जेदार व लवकरात लवकर पूर्ण व्हावे. या रस्त्याच्या स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करण्यात याव्यात.६) या विभागात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा सर्वे करून या स्वच्छतागृहांच्या दरवाजे खिडक्या कडी-कोयंडे स्वच्छता याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात.७) या विभागातील पूर्वीच्या असणाऱ्या कचरा कुंड्या काढल्यामुळे त्या जागेवर उघड्यावर लोक कचरा टाकतात तो कचरा परिसरात पसरतो. त्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात

. तसेच ओला व सुका कचरा जमा करणाऱ्या गाड्या वेळीवर येत नाहीत त्या वेळेवर येतील अशा उपाययोजना राबवाव्यात.८) या विभागात औषध फवारणी व धुराडा फवारणी (फोमिंग)च्या वेळच्या वेळी गाड्या पाठवाव्यात.९) या सर्व विभागात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात नागरिकांना होतो या गंभीर तक्रारीचे तातडीने निवारण व्हावे.१०) या विभागात राजश्री छत्रपती शाहू जलतरण तलाव व बॅडमिंटन मैदानाची स्थापत्य विषयक सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत.११) राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन हे नाव आकर्षक पद्धतीने लावावे तसेच या सांस्कृतिक भवनातील राहत असलेल्या पोलिसांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करून या भवनाची दुरुस्ती पेंटिंग करण्यात यावी.

१२) इंद्रानगर येथील हॉटेल पंचशील (डबल ट्री) व बसवेश्वर चौक या दोन्ही चौकात तातडीने गतिरोधक बसविण्यात यावेत‌‌.१३) आनंदनगर चिंचवड येथील पाण्याचे नियोजन चुकत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्याचे योग्य नियोजन करून नियोजन व पाणी सोडण्याची वेळ याचे फलक लावून पाणी वेळेवर पुरेसे सोडण्यात यावे.१४) इंदिरानगर येथील पुनर्वसित बिल्डींग मध्ये ड्रेनेज लाईनचे आउटलेट नसल्यामुळे या विभागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे तेथे तातडीने योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात.१५) वरील प्रभाग क्रमांक १९ व प्रभाग क्रमांक २० या विभागातील स्वच्छता पाणी ड्रेनेज औषध फवारणी आदि नागरी जीवनाच्या संबंधित या मूलभूत गरजा आहेत त्यामुळे त्यात तातडीने सोडवण्यात याव्यात अशा मागण्या सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केल्या

क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य समन्वयक श्री श्रीकांत सवणे यांनी या सर्व गंभीर समस्यांवर तातडीने उपाय योजना राबवून या समस्यांचे निराकरण करण्यात यावे आशे आदेश संबंधित सर्व विभाग प्रमुखांना दिले ‌. ‌

Latest News