पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वैदकीय अधिकारी डॉ अनिल रॉय यांची बोगस पदोन्नती,वेतनश्रेणी,ची चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करा : सत्यशोधक बहुजन आघाडी ची आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे मागणी

????????????????????????????????????

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वैदकीय अधिकारी डॉ अनिल रॉय यांना देण्यात आलेल्या बोगस पदोन्नती व वेतनश्रेणी, यांची चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करा : सत्यशोधक बहुजन आघाडी ची आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे मागणी

पिंपरी ( परिवर्तनाचा सामना ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदावर डॉ अनिल रॉय यांना 2013 साली बेकायदेशीरपणे ,बोगस कागद पत्राच्या आधारे पदोन्नती महापालिका प्रशासनाने दिली होती. मात्र सर्व पदोन्नती,वेतनश्रेणी,बेकायदेशीर असल्याने शासन मान्यता तात्काळ मिळू शकली नाही तरीपण महापालिकेने चौकशी करून गुन्हे दाखल केले नाहीत उलट आर्थिकहित संबधाखातर संबधित अधिकऱ्याची पाठराखण केली. तत्कालीन मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री देवेद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करून नव्याने पदोन्नती घेण्याचे आदेश दिले होते. त्याही पत्राला महापालिकेने ठेगा दाखवीला आहे.

डॉ अनिल रॉय यांना त्याच आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाची बेकायदेशीर पणे वेतनश्रेणी दिली मात्र शासन मान्यता मिळाली नसल्याने त्यांना देण्यात आलेली वेतनश्रेणितील गेल्या नऊ वर्षाचा फरक पगारातून, तात्काळ वसूल करणे आवश्यक आहे. तसेच महापालिकेची फसवणूक झाल्याने संबधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सत्यशोधक बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्रावण बगाडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देऊन केली आहे2013 साली डॉ अनिल रॉय यांची पदोन्नती मनापाने करून आरोग्य वैदकीय अधिकारी पदावर पदोन्नती दिली. मात्र एप्रिल 2016 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री, नगरविकास देवेद्र फडणवीस यांनी डॉ रॉय यांना दिलेली पदोन्नती ला शासन मान्यता देता येणार नसाल्याचे कळविले आहे.तेव्हापासून ते आजातगायत डॉ अनिल रॉय यांनी त्या पदाचा पगार बेकायदेशीर पणे घेतला आहे.

2013 ते 2022 गेल्या नऊ वर्षाचा फरक त्याच्या पगारातून तात्काळ वसूल करावा अन्यथा आम्ही महापालिका प्रशासनाच्या विरोधात कोर्टात दावा दाखल करणे भाग पडेल पिंपरी चिंचवड महापालिकेने 2018 ला डॉ अनिल रॉय यांना दिलेली पदोन्नती कागदावरच मागे घेतली, त्याचे सध्याचे पद वैद्यकीय अधिकारी असल्याचे आढळून येत आहे तरी देखील त्यांना केबिन,अधिकार,वेतन पगार,कशाचा आधारे दिला जातोय हे मात्र प्रशासन सांगायला तयार नाही

आरोग्य वैद्यकीय अधिकारी,आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या पदोन्नती बाबत पदोन्नती बैठकीत महापालिकेचे मुख्य ऑडिटर कुभोजकर यांनी डॉ रॉय यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाची वेतनश्रेणी देता येणार नाही असा रिमार्क दिला आहे असे असतानाही प्रशासनाने आर्थिक हितसंबधा खातरच कोणतेही कारवाई केली नाही व त्यांना चुकीचे वेतन व जास्तीचे वेतन दिल आहे ही करदात्या नागरिकांची फसवणूक आहे

31 मे 2013 पासून रॉय यांच्याकडे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पद नसतानाही व पदोन्नती विखण्डीत झालेली असतानाही वरिष्ठ पदाची बेकायदेशीर पणे वेतनश्रेणि व पगार दिला जातोय. तसेच बेकायदेशीरपणे त्यानी महापालिकेत करोडो रुपयाची खरेदी करूनमोठा गैरकारभार केला आहे त्यामुळे या सर्व प्रकारणाची खातेनिहाय शासना मार्फत चौकशी करावी.

रॉय याच्या सेवानिवृत्ती च्या वेळी त्यांना दिलेला बेकायदेशीर पगार, पेन्शन,फंड मधून वसूल करण्यात यावा.तसेच महापालिकेची फसवणूक झाल्याने त्याच्यावर व प्रशासनातील इतर संबधितावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा,अन्यथा या बाबत मुंबई हायकोर्टात रिट दाखल करण्यात येईल असा इशारा सत्यशोधक बहुजन आघाडीने आयुक्त पाटील यांना दिला आहे

Latest News