केंद्रीय तपास यंत्रणाचे छापे सिलेक्टीव:खा. सुप्रिया सुळे

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – एकत्रित येऊन देशासाठी काही करण्याऐवजी केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत आहे, हे दुर्दैव्य आहे, अशा खा सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. महागाई सारख्या मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्या म्हणाल्या. केंद्रीया यंत्रणा स्वायत्त राहल्या नाही. केंद्रीय तपास यंत्रणाचे छापे सिलेक्टीव आहेत

. भाजप सोबत राहले तर ते क्लीन असतात आणि जर विरोधात राहले तर ते डर्टी असतात, असाही टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्या कंपनीच्या ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. हा दडपशाही करण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या. भाजप केंद्राच्या यंत्रणा वापरून विरोधी पक्षाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्यामंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ईडीच्या कारवाईसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की नुसतं चौकशीला बोलवलं तरी, माझी मुलगी आत्महत्या करेल. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जितेंद्र आव्हाड भावनिक आहेत. मी समजू शकते अशा गोष्टींच्या एका वडिलाला काय वेदना होतात. कुटूंबावर आरोप प्रत्यारोप करण्याची कधीच महाराष्ट्राच्या राजकारणात पध्दत नव्हती. हे सर्व दुर्दैवी आहे.”

Latest News