बोपोडी व येरवडा मेट्रो स्टेशनंला डॉ बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावे:सामाजिक कार्यकर्ते अतुल गायकवाड

पुणे 🙁 ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )

  1. बोपोडी मेट्रो रेल्वे स्टेशन व येरवडा मेट्रो रेल्वे स्टेशन हे दोन्ही पुणे महानगर पालिका हद्दीत येत आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोपोडी पुणे मेट्रो रेल्वे स्टेशन यांच्या नावाने प्रसिद्ध करावे कारण मुंबई पुणे रोड बोपोडी स्टेशन हे चौकात असुन बोपोडी चौकाच्या उजव्या बाजूस खडकी छावणी परिषद ला जाणारा रस्ता चे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जात आहे आणि डाव्या बाजूस बोपोडी व औंध रोड या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक प्रसिद्ध आहे या दोन्ही भागात आंबेडकर चळवळीचे नेतृत्व करणारे डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना मानणारा सर्व जाती धर्माचे , सर्व राजकीय पक्ष चे नागरिक मोठ्या संख्येने आहे शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर सर्व महामानव यांच्या विचारांचे सर्व नागरिक राहत आहे येरवडा या स्टेशन चे नवीन नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर येरवडा मेट्रो स्टेशनं डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने प्रसिद्ध करावे व शिवाजीनगर मेट्रो रेल्वे स्टेशन चे नाव दुरूस्त करून छत्रपती शिवाजी महाराज नगर मेट्रो रेल्वे स्टेशन यांच्या नावाने प्रसिद्ध करण्यात यावे पुण्यनगरी मध्ये महामानवान यांचे नाव कुठेही ढावलण्यात येऊ नये त्यांचे नाव आदराने घेतले जाते बोपोडी व येरवडा या दोन्ही मेट्रो स्टेशन चे नवीन नाव दिनांक 14/एप्रिल/2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती च्या अगोदर नवीन नाव जाहिर करून वरील नावाची तातडीने सक्त अमलबजावणी करण्यात यावी शिवाजी नगर मेट्रो स्टेशन चे नाव तातडीने दुरुस्त करून छत्रपती शिवाजी महाराज मेट्रोस्टेशनं हे नाव जाहिर करावे बोपोडी व येरवडा मेट्रो स्टेशनंला डॉ .बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावे:सामाजिक कायकर्ते अतुल गायकवाड अशी मागणी त्यांनी केली आहे

Latest News