मेट्रोलाही आता पालिकेच्या मिळकत कर (Tax) भरावा लागणार…


पुणे- ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – व्यावसायिकदराने कर आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्प सुरू होताच महापालिका प्रशासन तातडीने कामाला लागले असून महामेट्रोकडून माहिती मागविण्यात आली आहे. पुणे शहरात मेट्रोची सुमारे 21 ते 22 स्थानके असणार असून एक इंटरचेंज स्टेशन तसेच एक कार डेपो असणार आहे. त्यामुळे जस-जशी ही बांधकामे वापरण्यास सुरूवात होईल तस-तसा कर आकारला जाणार आहे.
शहरात नुकतीच मेट्रोची सेवा सुरु झाली आहे. व्यावसायिक पद्धतीनेसुरु झाल्याने आता कार्यालये आणि इतर अस्थापनांना महापालिकेकडून मिळकतकर आकारण्यात येणार आहे. याबाबत पुणे महापालिकेने मेट्रो स्थानकांची माहिती महापालिकेला सादर करण्याबाबत पात्र दिले आहे
. त्यामुळे मेट्रोलाही आता पालिकेच्या मिळकत कर(Tax) भरावा लागणार आहे. शहारातील मेट्रो प्रकल्पाच्या टप्प्यातील वनाज ते गरवारे महाविद्यालय या दरम्यानची पाच किलोमीटरची मेट्रो सेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यास सेवेचं उदघाटन करण्यात आले आहे.
नियमानुसार मेट्रोने स्थानकांसाठी जे बांधकाम केले आहे. तसेच ज्या मिळकतीचा पुर्णत्वाचा दाखला घेतला आहे.पुणे महानगर पालिकेकडून तूर्तास मेट्रोचा वापर सुरू झालेल्या स्थानकांची माहिती मागविण्यात आली आहे. मात्र, त्या सोबतच शहरात उभारलेले खांब तसेच मेट्रो मार्गाच्या बांधकामावरही कर आकारणी करता येते का? मेट्रो सुरु झालेल्या शहरात कशा प्रकारे कर आकारणी केलीजात आहे. याची माहिती पुणे महापालिकेने मुंबई महापालिका, नागपूर महापालिका तसेच दिल्ली सरकारकडूनही मागविली आहे. त्याबाबतचे पत्र पालिका प्रशासनाकडून नुकतेच देण्यात आले आहे.