अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी – आमदार देवयानी फरांदे


नाशिक ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) नाशिक महानगरपालिका जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथे होणारे लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. तसेच यापुढे कसलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली. आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, या वर्षभरात जास्तीत जास्त शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
– नाशिक पीव्हीआर सिनेमा येथे ‘काश्मीर फाईल’ सिनेमा पाहण्यासाठी काही महिला गेल्या होत्या. एकमेकींची ओळख पटावी म्हणून त्यांनी गळ्यात भगवा स्कार्फ घातला होता. त्या चित्रपट गृहाच्या प्रवेशद्वारजवळ गेल्यानंतर तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या गळात असलेले स्काफ जमा करायला सांगितले. महिलांनी स्कार्फ देण्यास नकार दिल्यानंतर जबरदस्तीने तो खेचण्याचा प्रयत्न केला. तसेच सुरक्षारक्षकांनी आम्हाला वरीष्ठाचा आदेश असल्याचे सांगितले. सभागृहात सुध्दा आमदार भगवे घालून आहेत. भगव्याच्या बाबतीत या सरकारला इतका राग असण्याचं कारण काय ?
अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली. तसेच त्या सुरक्षा रक्षकावरती कारवाई करावी अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी सदरची बाब गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. आज विधानसभा अधिवेशनात आमदार देवयानी फरांदे यांनी द्वारका येथील अवैध वाहतुकीचा मुद्दा उपस्थित केला. द्वारका येथे पोलिस व अवैध वाहतूक करणारे यांच्यात संगनमत असल्यामुळे हा प्रकार घडत आहे. आत्तापर्यंत पोलिसांना अवैध वाहतुक करणाऱ्यांच्यावरती एकदाही कारवाई केलेली नाही.
त्यामुळे या प्रकरणावरती तोडगा काढण्यासाठी मंत्री महोदय यांनी आपल्या दालनात बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाईयांनी अवैध वाहतुकीवर कारवाई केली जाईल. तसेच लवकरात लवकर त्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले जाईल असे आश्वासन विधानसभेत दिले.