मालमत्ता थकबाकीदारांना 31 मार्चपर्यंत कर भरण्याची संधी; अन्यथा कडक कारवाई

पिंपरी, 28 मार्च 2022 🙁 ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ): कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांचे थकीत कर वसूलीची कारवाई सुरू आहे. थकबाकीदारांचे कर वसूलीकामी माहे मार्च 2022 मध्ये करवसूली मोहिम तीव्र करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 538.84 कोटी मालमत्ता कर वसूली झाली आहे. कर संकलन विभागाचे 16 करसंकलन विभागीय कार्यालयातील वसूली पथकामार्फत थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीसा देण्याची कार्यवाही चालू असून ज्या थकबाकीदारांनी नोटीस देऊनही कर भरणेस टाळाटाळ केली अशा मालमत्ताधारकांचे मालमत्ता जप्ती कारवाई करणेत येत आहे

. मालमत्ता जप्ती कारवाई मोहिमेत थकबाकी भरणा न केलेने मालमत्ता सील केल्या आहेत, थकबाकीदारांनी त्वरित कर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.
मालमत्ता कराची थकबाकी वसूलीकामी महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन आढावा घेऊन थकबाकीदाराचे मालमत्ता जप्ती मोहीम तीव्र करण्यात येत आहे. अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ कराचा भरणा करणेची नागरिकांना सुविधा व मनपा कर शास्ती वर ७०% सवलत देणेत आली आहे. सदर सुविधा 31मार्च 2022 पर्यंत आहे. नागरिकांना मुळ कर भरणे व सवलतीचा लाभ घेण्यासाठी फक्त 3 दिवसांचा अवधी बाकी आहे. त्यानंतर यापुढे अशी योजना व सवलत देण्यात येणार नाही

. सर्व करसंकलन विभागीय कार्यालय येथील भरणा केंद्र दि. 28 मार्च 2022 पासुन सकाळी 9 पासुन रात्री 9 पर्यंत सुरु ठेवणेत येणार आहे. तरी त्वरीत मालमत्ता कर भरणा करुन पाणीपुरवठा खंडीत होणे, मालमत्ता सील होणे यासारखी कठोर कारवाई टाळावी, असेही त्यांनी म्हटले आहे.