केंद्र स्तरावर पुकारलेल्या संपात, पिंपरी-चिंचवडमध्ये बंदला प्रतिसाद
चिंचवड येथील वाल्हेकरवाडीमध्ये दुपारी वीज पुरवठा खंडित झाला. मात्र, महावितरणचे कर्मचारी संपावर असल्याने खंडित वीज पुरवठ्याचे नेमके कारण शोधता आले नाही. परिणामी रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पुर्ववत झालेला नव्हता. त्यामुळे वाल्हेकरवाडी रात्री उशिरापर्यंत अंधारात होती. उकाडा आणि डासांच्या त्रासाने नागरिक त्रस्त झाले होते.काही बँका सुरू होत्या मात्र काम करणारा कर्मचारी वर्गच उपस्थित नव्हता. त्यामुळे बँका सुरू असून, ग्राहकांना सुविधा मिळाल्या नाहीत.सलग चालून आलेल्या सुट्टयांचा विचार करून एटीएममध्ये कॅश टाकण्यात आली होती.मात्र बर्याच ठिकाणीच कॅश संपल्याने एटीएममध्ये खडखडाट होता. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली.बँकामध्ये जाऊन आरटीजीएस, एनईएफटी, क्लिअरींग, पासबुक, चेकबुक तसेच वैयक्तिक कामे खोळंबली होतीपिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रीयीकृत बँका, पोस्ट विभाग, अंगणवाडी, महावितरण कार्यालय, विमा क्षेत्र, असंघटीत क्षेत्र, काही अधिकारी संघटना यांनी ऑल इंडिया बँक एम्पालॉईज असोसिएशन संघटनेच्या अंतर्गत केंद्र स्तरावर पुकारलेल्या संपात सहभाग नोंदविला.त्यासोबतच तिसरा शनिवार आणि रविवारसोबतच सोमवार व मंगळवार अशी सलग चार दिवस बँका बंद असल्याने निगडी, आकुर्डी भागातील बर्याच एटीएममधील पैसे संपल्याने ग्राहकांची गैरसोय झाली. मंगळवारी बंद संपणार असून, सर्व कार्यालयातील कर्मचारी बुधवारपासून (दि. 30) कामावर हजर राहतील. अशी माहिती पुणे जिल्हा बँक एम्प्लॉईज असोशिएनचे सहयोगी सचिव शिरिष राणे यांनी दिली.त्यामुळे दुसर्या दिवशी मंगळवारी(दि. 29) पिंपरी-चिंचवडमध्ये बंदला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.मंगळवारी शहरातील पोस्ट विभाग बंद असल्यामुळे पोस्टात आलेल्या ग्राहकांना परत जावे लागले. तसेच काही बँका बंद होत्या तर काही बँका सुरू होत्या.बँकामधील आरटीजीएस, एनईएफटी, क्लिअरींगची कामे खोळंबली होती. एसबीआय, इंडियन ओव्हसीज बँक सारख्या काही बँका सुरू होत्या. मात्र, बँकामधील महत्वाची कामे करण्यासाठी कर्मचारीच उपस्थित नसल्याने बँका केवळ नावालाच सुरू होत्या. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती.