पहिली ते अकरावीच्या शाळा व कॉलेज एप्रिल अखेरपर्यंत सुरू ठेवणार
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचा शिक्षण विभाग एप्रिल महिन्यात अप्रगत विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर भर देणार आहे, अशी माहिती प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली एप्रिल महिन्यात शाळा सुरू ठेवण्यास मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विरोध नाही. कारण बहुतांश पालक कामानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो.त्यामुळे मुले उन्हातान्हात फिरण्याऐवजी शाळेत एकाजागी बसतील. अशा परिस्थिती मुले शाळेत सुरक्षित असतात.-संजय नाईकडे (प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग)
गेली दोन वर्षे कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी एप्रिल महिन्यात विशेषत: अप्रगत विद्यार्थ्यांकडे लक्ष देवून त्यांची इतर विद्यार्थ्यांसारखी प्रगती कशी होईल, याकडे लक्ष दिले जाणार आहे.यामध्ये ज्या शिक्षकांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला आहे. त्यांनी तो पूर्ण करायचा आहे. त्यासोबतच इतरांनी प्रगत विद्यार्थ्यांबरोबर अप्रगत विद्यार्थ्यांना कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे.पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांची शाळा व कॉलेज एप्रिल अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत.