विरोधाला न जुमानता पुणे महापालिका प्रशासन संपूर्ण शहरातील अतिक्रमणे काढणार,


पुणे-कोणत्याही विरोधाला न जुमानता महापालिका प्रशासन संपूर्ण शहरातील अतिक्रमणे काढणार . कारवाईसाठी सुमारे पंचवीस जेसीबी, दीडशे अधिकारी व कर्मचारी, 100 पोलीस यांच्यासह दंगल पथक घटनास्थळी कारवाईसाठी तैनात करण्यात आलेले आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली आहे.
निरीक्षक व चालक यांना कारवाईदरम्यान झालेल्या हल्ल्याचा काळया फिती लावून निषेध नोंदवत बुधवारी सकाळी अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली. कोणत्याही विरोधाला न जुमानता महापालिका प्रशासन संपूर्ण शहरातील अतिक्रमणे काढणार . कारवाईसाठी सुमारे पंचवीस जेसीबी, दीडशे अधिकारी व कर्मचारी, 100 पोलीस यांच्यासह दंगल पथक घटनास्थळी कारवाईसाठी तैनात करण्यात आलेले आहे
. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली आहे.शहारत प्रशासनाचा कार्यकाळ सुरू झाल्यापासून अतिक्रमणाच्या कारवाईला चांगलाच वेग आला आहे. अनेक ठिकाणी पोलिकेने बुलडोझर फिरवायला सुरू केले आहे. यात स्थानिकांचा निवारा, दुकानं अनेक गोष्टी हिरावल्या जात आहेत. त्यामुळे स्थानिकही चांगलेच आक्रमक होत आहेत.
काल(मंगळवारी) शहरातील कारवाई करत असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यावस्थानिक नागरिकांनी हल्ला केला. या घटनेनंतर आज महापालिकेने पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली आहे. या मोठ्या कारवाईसाठी अतिक्रमण विभागाच्या संपूर्ण स्टाफ सह आकाशचिन्ह परवाना व बांधकाम विभाग तसेच येरवडा क्षेत्रीय कार्यालतील सर्व अधिकारी व कर्मचारी कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत.
शहरातील धानोरी येथे काल (मंगळवारी) अतिक्रमण कारवाईदरम्यान अधिकारी व कर्मचारी यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. कारवाई साठी गेल्यानंतर ही घटना घडली होती. अतिक्रमण काढण्यास विरोधात करत स्थानिक नागरिकांनी काल कारवाईदरम्यान अतिक्रमण निरीक्षक व जेसीबी चालक यांच्यावर हल्ला केला. यात महापालिकेचा कर्मचारी जखमी झाला आहे . त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.