शांता शेळके जन्मशताब्दी निमित्त ९ एप्रिल रोजी ‘अनवट शांताबाई ‘ ———- ‘भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत प्रसिध्द कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘ अनवट शांताबाई ‘ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, ९ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली. प्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या काही कविता,गीते आणि त्यांचे ललित गद्य यावर आधारित ‘ अनवट शांताबाई ‘ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे

.या कार्यक्रमाची संहिता आणि बांधणी डॉ. वंदना बोकील- कुलकर्णी यांनी केली आहे. अभिवाचन अनुराधा जोशी, गौरी देशपांडे आणि दीपाली दातार करणार आहेत. त्यांना अनुप कुलथे व्हायोलिन वर साथसंगत करणार आहेत.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ११७ वा कार्यक्रम आहे………………………

Latest News