बाऊन्सर असतील तर त्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल…


पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- उंड्री येथील युरो शाळेत ही पुन्हा बाऊन्सरकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आली. शालेय शुल्काबाबतचा हा वाद आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या त्यावेळी सूचना दिल्या होत्या. या प्रकारामुळे शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला शाळेकडून केराची टोपली दाखवली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. आता शिक्षणमंत्री अशा मुजोर शाळांवर कारवाई करणार असल्याचे म्हणत आहेत. या प्रकारानंतर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शिक्षण उपसंचालक उकिरडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधी अश्विनी सातव डोके यांनी केलेली ही बातचीत –येथील एका शाळेत बाऊन्सरने पालकाला मारहाण केलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये शाळेत निवदेन घेऊन गेलेल्या पालकाला तेथे उपस्थित असलेल्या बाऊन्सरने मारहाण केली होती. पालकाने गैरवर्तन केल्याचा आरोप करत बाऊन्सरने ही मारहाण केली, काठीने चोप देत पालकाला पायऱ्यांवरून खाली ढकलून दिले. या घटनेचा सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मयूर गायकवाड वय (49 वर्षे) या पालकास मारहाण झाली होती.शाळेत जर अशी प्रतिक्रिया शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे अनेक पालकांनी शाळेची फी भरलेली नाही, त्यामुळे शाळेने मुलांचे दाखले मेलने पाठवून दिल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मीच आज पालकांना शाळेत जायला सांगितले होते. पण त्यानंतर त्याठिकाणी धक्काबुक्की झाल्याचे पालकांनी सांगितले आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही उकिरडे म्हणाले आहेत. शालेय शुल्काबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या, त्या विद्यार्थ्यांना शाळेने मेलद्वारे टीसी पाठवले. शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेला. तर प्रवेशावेळी पालकांना बाऊन्सरकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला, त्यावर उकिरडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.