एजायल लीडरशिप ‘ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र,भारती विद्यापीठ आय एम ईडी मध्ये आयोजन


‘एजायल लीडरशिप ‘ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र
……………….
भारती विद्यापीठ आय एम ईडी मध्ये आयोजन
पुणे :
भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ( आयएमईडी )यांच्या वतीने ‘ एजायल लीडरशीप विषयावर एचआर सेमिनार २०२२ या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते .
भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ .सचिन वेर्णेकर, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक देवेंद्र दत्त मिश्र, मेघा रावल या तज्ञांनी मार्गदर्शन केले.
डॉ. प्रवीण माने, डॉ. हेमा मिरजी, डॉ सोनाली खुर्जेकर ,डॉ सचिन आयरेकर, डॉ. दीपक नवलगुंद, डॉ. श्याम शुक्ला, डॉ. वृषाली शितोळे, डॉ. अनुराधा येसुगडे यांनी संयोजन केले. हे चर्चासत्र ४ एप्रिल रोजी आयएमईडी सेमिनार हॉल येथे पार पडले.