होप मेडिकेअर फाउंडेशन च्या आरोग्य सप्ताहास प्रारंभ

दर शनिवारी मोफत दवाखाना उपक्रम

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर होप मेडिकेअर फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबीर सप्ताह , दर शनिवारी मोफत दवाखाना,या उपक्रमाचा प्रारंभ मंगळवार,५ एप्रिल रोजी करण्यात आला . पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ झाला.

पुणे विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांना सायकल चे वाटप यावेळी करण्यात आले. डॉ अमोल देवळेकर ,डॉ दीपा देवळेकर ,डॉ शिवाजी कोल्हे ,डॉ शीतल कोल्हे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. समर्थ पोलीस स्टेशन जवळ हा कार्यक्रम पार पडला . या आरोग्य शिबीर सप्ताहात समर्थ पोलीस स्टेशन मधील कर्मचारी ,कुटुंबियांना ,तसेच सोमवार पेठ ,भवानी पेठ ,पोलीस लाईन मधील रहिवाशांना मोफत सर्वरोग निदान ,तपासणी आणि उपचार करण्यात येतील . समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे, पोलिस निरीक्षक उल्हास कदम यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी,कर्मचारी ,सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते .