‘हाय पॉवर ऑफिस मॅनेजमेंट’ या अभिनव अभ्यासक्रमाचे दालन पुण्यात खुले…


पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – इन्स्टिटयूट ऑफ पर्सनल असिस्टंट ट्रेनिंग ” (iPAT) संस्थेच्या माध्यमातून “हाय पॉवर ऑफिस मॅनेजमेंट” विषयक अभिनव अभ्यासक्रमाचे दालन पुण्यात खुले झाले असून भारतात उपलब्ध असलेला हा अशा प्रकारचा एकमेव प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आला आहे.
‘इन्स्टिटयूट ऑफ पर्सनल असिस्टंट ट्रेनिंग’ चे चित्रसेन गायकवाड व शशांक पाटील , प्रशांत कोठडिया, विश्वजित इनामदार, विद्याभूषण आर्य यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एक्सिक्यूटीव्ह असिस्टंट, पर्सनल असिस्टंट, पब्लिक रिलेशन ऑफिसर, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी, लायझनिंग ऑफिसर अश्या उच्चपदस्थ पदांवर लागणाऱ्या बुद्धिमान, चाणाक्ष, गुणवान कॅन्डीडेट घडविण्यासाठी इन्स्टिटयूट ऑफ पर्सनल असिस्टंट ट्रेनिंग ” (iPAT) या संस्थेने या अभिनव अभ्यासक्रमाची रचना केली आहे. ‘इन्स्टिटयूट ऑफ पर्सनल असिस्टंट ट्रेनिंग’(iPAT) ही कॉर्पोरेट, राजकीय आणि इतर सर्वक्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारी पदांसाठी लागणाऱ्या संघटनात्मक कौशल्ये असणारी, एक्झिक्यूटिव्ह असिस्टंट व इतर पदांवरील अधिकारी, कार्यकारी ह्या बाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी वचनबद्ध असलेली एक विशेष संस्था आहे.
‘इन्स्टिटयूट ऑफ पर्सनल असिस्टंट ट्रेनिंग’ (iPAT) द्वारे औद्योगिक, कॉर्पोरेट, कार्यकारी, सेलिब्रिटी आणि राजकीय कार्यालयांचे कामकाज व्यवस्थापित करण्यात मदत करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे नेमके कार्य, कर्तव्य व जवाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी इच्छुकांना प्रशिक्षण आणि सहाय्य केले जाते व सखोल पद्धतीने तयार केलेला हा अभ्यासक्रम एकमेव प्रकारचा आहे.
सर्व कौशल्ये आणि प्रशिक्षणाची जोड :
कॉर्पोरेट, प्रशासन, राजकारण, सेलीब्रिटी, खासगी व्यवसायकांपासून शैक्षणिक, सामाजिक संस्थांना मोठ्या प्रमाणावर अश्या जवाबदाऱ्या हाताळणारे उच्चशिक्षित, हुशार, प्रशिक्षित युवक लागतात. जवाबदारी मोठी असल्याने पगार आणि सुविधा चांगल्या मिळतात. मात्र त्यांचे प्रशिक्षण करणाऱ्या शैक्षणिक सुविधा, अभ्यासक्रम पुरेशा प्रमाणात भारतात नाही. ही उणीव लक्षात घेऊन “इन्स्टिटयूट ऑफ पर्सनल असिस्टंट ट्रैनिंग” (iPAT) संस्थेची स्थापना करण्यात आली असून अश्या जबाबदारीच्या पदांवर लागणाऱ्या सर्व कौशल्ये आणि प्रशिक्षणाची जोड ‘इन्स्टिटयूट ऑफ पर्सनल असिस्टंट ट्रेनिंग’ कडून या ४५ दिवसांच्या अभ्यासक्रमात देण्यात आली आहे.
जबाबदारीच्या पदावर सर्व प्रकारचे व्यवस्थापन करावे लागते. मुद्दे टिपण्याचे कौशल्ये (drafting), संभाषण कौशल्ये, कार्यालयीन व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, बैठकींचे इतिवृत्त (मिनिट्स ऑफ मीटिंग), प्रोटोकॉल मॅनेजमेंट, अश्या अनेक कौशल्यांचे आणि प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ते या संस्थेमार्फत देण्यात येणार आहे.
करिअरची एक नवी सुरुवात :
सदर कोर्सेससाठी इच्छुक असणारे उमेदवार, नौकरी करणारे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या, सी.ए ची तयारी किंवा व्यवसायात असताना किंवा त्यांचे शिक्षण पूर्ण करत असताना देखील हा कोर्स करू शकतात. त्यासोबतच, ज्यांना आपल्या करिअरची एक नवी सुरुवात करायची आहे किंवा नव्याने करिअरचा विचार करणा-या व्यक्तीसाठी देखील उत्तम संधी आहे. अभ्यासक्रम प्रत्येक इच्छुकांना सर्वसमावेशक माहिती व कौशल्यांनी सुसज्ज करतो, ज्यामुळे नोकरीसाठीची पात्रता मिळू शकते. हा अभ्यासक्रम डायनॅमिक व्यवसायात प्रवेश करण्यासाठी व तेथे उत्कृष्ट पद्धतीने काम करण्यासाठी जणू पासपोर्टच आहे.
‘इन्स्टिटयूट ऑफ पर्सनल असिस्टंट ट्रेनिंग’ (iPAT) हे प्लेसमेंटसाठी मदत करणार आहे. यातील विद्यार्थ्यांना १०००० ड्राफ्ट्स देण्यात येणार आहे., यात विविध विषयांचे ड्राफ्ट्स, पत्र, रिपोर्ट्स, फॉरमॅट्स आहेत.एखाद्या व्यक्तीला, संस्थेला पी.ए हवा असल्यास ते iPAT ला संपर्क करू शकतात. हा कोर्से ऑनलाईन,ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येऊ शकतो.
दरमहा विनामूल्य कार्यशाळा
या अभिनव विषयाचे महत्व लक्षात घेऊन दर आठवड्याला एक कार्यशाळा विनामूल्य घेतली जाणार आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
अधिक माहिती www.ipatinstitute.com संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे