बेकायदेशीर दस्त व्यवहार झाल्यास तत्काळ संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करा- श्रावण हर्डीकर


पुणे- (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) पुण्यासह राज्यातील इतर शहरात “रेरा’ कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदविल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहरात तब्बल 10 हजार 561 दस्त नियमबाह्यपणे नोंदविण्यात आले आहे. याप्रकरणी 44 अधिकारी-कर्मचारी यांना निलंबित करण्यात आला आहे. याप्रकरणाची व्याप्ती व गांभार्य पाहून नोंदणी विभाग आता सतर्क झाला आहे. बेकायदेशीर दस्त व्यवहार होणार नाही, याकरिता काटेकोरपणे संबंधित अधिकाऱ्यांनी पालन नियमांचे करावे. जर बेकायदेशीर दस्त व्यवहार झाल्यास तत्काळ संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशा सूचना नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी दिल्या आहेत.यामुळे पहिल्या टप्प्यातच बेकायदेशीर व्यवहाराला पायबंद घातला जाऊन व्यवहारात पारदर्शकता येण्यास मदत होईल.
धोरणात्मक निर्णयाची गरज
नोंदणी व मुद्रांक विभागाची आढावा बैठक महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली. याबैठकीस नोंदणी महानिरीक्षक हर्डीकर हे ऑनलाइनद्वारे उपस्थित होते. त्यावेळी हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
अवैध दस्त नोंदणीला आळा घालण्याकरीता केंद्रस्तरावर तसेच राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. याकरिता तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करुन येत्या अधिवेशनापर्यंत नियम तयार करण्याच्या दृष्टीने माहिती पाठविण्याच्या सूचना राज्यमंत्री सत्तार यांनी दिल्या.