शरद पवार यांनी माझ्या पती विरोधात षडयंत्र रचले: जयश्री पाटील

मुंबई : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा नेला आणि या मोर्चाने नंतर मोठा धुडगूस घातला. थेट शरद पवार यांच्या घरावर कर्मचाऱ्यांनी चप्पला फेकल्या. यानंतर लगेचच पोलिसांकडून एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली

सदावर्ते यांनी पोलीस प्रशासनावर आरोप केला आहे की कोणतीही नोटीस न देता मला अटक करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना वैद्यकीय तपासणीसाठी पोलिस जे. जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत. जेष्ठ नेते शरद पवार यांनी माझ्या पतीविरोधात षडयंत्र रचले आहे असा आरोप जयश्री पाटील सदावर्ते यांनी केला

भारतीय दंड विधान १४१, १४९, ३५३, ३३२, ४५२, १२० ब आणि ४४८ आदी कलमांच्या आधारे गुणरत्ने यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये हल्ला घडवून आणणे, कट रचणे, सरकारी कर्मचारी मारहाण आदींचा त्यात समावेश आहे. अटक केल्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगी हे उपस्थित होते

.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला आहे. सरकारने ज्यापद्धतीने सांगितले होते त्याच पद्धतीने एसटीची पगारवाढ करण्यात आली आहे.परिवहन मंत्री अनिल परब यांनी मागच्या काही महिन्यांमध्ये सांगितल्या प्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि भत्ता देण्यात येणार आहे, असं देखील कोर्टाने स्पष्ट केलं.हा निर्णय झाल्यानंतर सुरुवातीला आझाद मैदानात फटाके फोडण्यात आले, मिठाया वाटण्यात आल्या मात्र आज काहीतरी वेगळी परिस्थिती दिसून आली. कोर्टचा निर्णय आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक भाषण केले आणि नंतर परिस्थिती चिघळली असा आरोप करण्यात येत आहे.