पाकिस्तानात: विरोधात शून्य मते इम्रान हे पहिले पंतप्रधान


इस्लामाबाद (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पक्षांच्या सदस्यांचा सभात्याग, सभात्यागावेळी सत्ताधारी व विरोधीपक्षांच्या सदस्यांमध्ये सभागृहातच झालेली हाणामारी आणि शनिवारी मध्यरात्री अविश्वास ठरावावर झालेले मतदान अशा नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानातील `इम्रानशाही` अखेर खालसा झाली. अविश्वास ठरावाच्या बाजूने १७४ मते मिळाली, तर विरोधात शून्य मते मिळाली. अशा प्रकारे पदावरून हटविले जाणारे इम्रान हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
यांना सत्ताच्युत करण्यासाठी ३४२ सदस्यांच्या सभागृहामध्ये विरोधकांना १७२ सदस्यांचे बळ आवश्यक होते. विरोधकांना इम्रान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिके- इन्साफ’ या पक्षाचे मित्र असणाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सत्तेचा गेम खेळण्याचा निर्धार करत मैदानात उतरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज विरोधकांना अक्षरशः दिवसभर झुलविले. परंतु, ते दिवसभरात नॅशनल असेंब्लीत फिरकलेच नाहीत. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावरील मतदानाला बगल देत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. इम्रान यांनी राजीनामा द्यावा म्हणून ‘आयएसआय’ आणि लष्करानेही दबाव आणला होता पण शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत इम्रान यांनी हा दबाव झुगारून लावत पंतप्रधानपदाचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला.अखेर चेंडूपर्यंत खेळणार अशी भूमिका घेत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रात्री उशिरा आपल्या मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेतली. अविश्वास प्रस्तावावरील मतदान इम्रान खान यांनी सकाळपासून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत अविश्वास ठरावावर मतदान टाळण्याचा अटोकाट प्रयत्न चालवला होता. शेवटी भारतीय वेळेनुसार रात्री 12:25 मिनिटांनी अविश्वास प्रस्तावावर मतदान सुरू झाले. तत्पूर्वी, सर्व सरकारी कर्मचार्यांना पाकिस्तान सोडण्यास मनाई करण्यात आली.सर्व विमानतळांवर अॅलर्ट जारी करण्यात आला. अनेक रुग्णालयांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली. सुरक्षाही वाढवण्यात आली. पाठोपाठ राजधानी इस्लामाबादेत लष्करी वाहने फिरू लागली. तेवढ्यात लष्करप्रमुख जन. कमार जावेद बाजवा यांना बडतर्फ करण्यात आलेले नाही एवढाच खुलासा पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आणि मतदान होणार किंवा नाही याचे गूढ कायम ठेवले.
नॅशनल असेंब्लीत इम्रान यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी पाकिस्तान मुस्लिम लिग (नवाज), पाकिस्तान पीपल्स पार्टी (भुट्टो) या प्रमुख विरोधी पक्षांना 172 मतांची गरज होती. मध्यरात्रीनंतर झालेल्या मतदानात प्रत्यक्षात 174 म्हणजे 2 मते जादा पडली आणि इम्रान खान यांचे सरकार गडगडलेसुप्रीम कोर्टाने शनिवारीच मतदान घ्या, असे बजावल्यानंतरही इम्रान यांनी दिवसभर तासा-तासाने मतदान पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला.
मात्र, मध्यरात्री शक्ती परीक्षेचा क्षण आला तेव्हा इम्रान एकाकी पडले. अविश्वास प्रस्तावावर मतदान सुरु झाले तेव्हा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ या इम्रान यांच्या पक्षाचा एकही खासदार सभागृहात उपस्थित नव्हता. दुसरीकडे इम्रान यांनी पंतप्रधानाचे शासकीय निवासस्थान सोडले आणि हेलिकॉप्टर घेऊन ते इस्लामाबाद बाहेर देखील पडले. आपल्या सरकारचा फैसला ऐकण्यासाठीही ते थांबले नाहीत पाकिस्तानच्या संसदेत शनिवारी मध्यरात्री रंगलेल्या अविश्वास ठरावाच्या सामन्यात अखेरचा चेंडू न खेळताच पंतप्रधान इम्रान खान आऊट झाले.
संसदेत विरोधकांनी दाखल केेलेला अविश्वास ठराव 174 मतांनी मंजूर झाला. मात्र, हा निकाल लागण्याच्या आधीच इम्रान यांनी आपले शासकीय निवासस्थान सोडले व ते त्यांच्या खासगी निवासस्थानाकडे रवाना झाले होते.
दरम्यान, लष्कर आणि आयएसआय प्रमुखांनी इम्रान खान यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयानेही हे प्रकरण रात्री पुन्हा सुनावणीला घेतले. पाच न्यायाधीशांचे पीठ संसदेच्या सचिवांना तातडीचे बोलावणे पाठवू शकते आणि इम्रान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याचा आदेश पुन्हा देऊ शकते, अशी स्थिती निर्माण होताच ठराव एकदाचा मतदानास घेण्यात आला. इम्रान सरकारचा निकाल संसदेनेच लावल्याचे समजल्यानंतरच पाकिस्तानचे सरन्यायाधीश आणि अन्य न्यायमूर्तीही सर्वोच्च न्यायालयातून आपापल्या निवासस्थानी रवाना झाले.
ठिकठिकाणी इम्रान समर्थक रस्त्यावर उतरत निदर्शने करत होते तर दुसरीकडे संसदेत सर्व विरोधी पक्षांच्या सरकार स्थापनेच्या दिशेने सुरू झाल्या होत्या. प्रमुख विरोधी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लिगचे (नवाज) नेते शहबाज शरीफ यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग खुला झाल्याचे म्हटले जाते.