रमझानचे उपवास करणाऱ्या विद्यार्थिनींना सुखद अनुभव! आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेजचा उपक्रम

बारावीच्या शेवटच्या पेपर नंतर मिळाली इफ्तार पार्टी आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेजचा उपक्रम

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

रमझानचे उपवास (रोझे) करणाऱ्या ,टळटळीत उन्हाळ्याच्या दुपारी बारावी परीक्षेचा शेवटचा पेपर देणाऱ्या विद्यार्थिनींना सायंकाळी घरी जाण्यापूर्वी महाविद्यालयातच इफ्तार पार्टी (रोझा इफ्तार चा सुखद अनुभव मिळाला !

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज, (आझम कॅम्पस )च्या वतीने दि.7 एप्रिल रोजी विद्यार्थिनीं सह ‘ रोजा ईफ्तार ‘चे आयोजन करण्यात आले होते.इयत्ता बारावीचा शेवटचा पेपर दुपारी 3 ते 6.30 पर्यंत असल्यामुळे व विद्यार्थिनीं ना उपवास असल्यामुळे रोझा इफ्तारचे आयोजन काॅलेज प्रशासन तर्फे आयोजित करण्यात आले होते.साडे सहाला पेपर संपल्यावर उपवास सोडण्याची वेळ ६.५० ही असल्याने २० मिनिटात विद्यार्थिनी घरी पोहोचणे अवघड असल्याचे लक्षात आल्याने कॉलेज प्रशासनाने रोझा इफ्तारची व्यवस्था केली. खजूर, समोसा, शीतपेये, फळे, थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली.

काॅलेज चे प्राचार्य गफ्फार सय्यद आणि शिक्षक सहकाऱ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. तसनीम शेरकर , नाजीमा दारुवाला, गोहर अंजुम, झीनत मॅडम, हशमत मॅडम, जुबेदा मॅडम, अब्दुला खान व रूबीना खाला व अन्य कर्मचारीवर्ग यांची मोलाची साथ लाभली.मुख्यत : व्होकेशनल ट्रेनिंग विभागाच्या ‘कोर्स ऑफ ओल्डेज होम्स’ (COH) च्या विद्यार्थिनीनी ही संपूर्ण धूरा सांभाळली.

प्राचार्य गफार सय्यद म्हणाले,’ कोरोना साथीच्या २ वर्षानंतर परीक्षेला महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थिनींना हा उपक्रम आवडला ‘

सुमारे २५० विद्यार्थिनींसह शिक्षकांनी या इफ्तारमध्ये सहभाग घेतला. ‘ आम्हाला हा उपक्रम सुखद धक्का असून संस्मरणीय क्षण असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार आणि पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.